डार्विनचा सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत लिहा

डार्विनचा सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत लिहा

डार्विनचा सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत लिहा.

उत्तर

डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत :

i) या सिद्धांतानुसार, पृथ्वीवरील पहिले जीवद्रव्य (सजीव पदार्थ) समुद्रात निर्माण झाले. या जीवद्रव्यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली.

ii) त्यानंतर, एकपेशीय सजीवामध्ये क्रमाक्रमाने संथ गतीने प्रागतिक बदल घडून आले. त्यापासून अधिक मोठे जटिल सजीव निर्माण झाले.

iii) शेवटी, या सजीवांच्या वर्तनप्रकारातही बदल झाले. हा विकास अत्यंत धीम्या गतीने 300 कोटी वर्षांच्या काळात झाला. सजीवांचा बदल आणि विकास सर्वव्यापी आणि सर्व अंगांनी होत गेला. त्यांतूनच अनेक प्रकारचे सजीव निर्माण झाले. म्हणून यास क्रमविकास म्हटले जाते.

Previous Post Next Post