पर्यायी इंधनाचे स्रोत तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकाल

पर्यायी इंधनाचे स्रोत तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकाल

पर्यायी इंधनाचे स्रोत तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकाल ?

उत्तर

i) पर्यायी इंधनाचे स्रोत शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

ii) जीवाश्म इंधने अपुनर्नवीकरणीय असल्यामुळे आणि त्यांच्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणदेखील वाढत असल्यामुळे पर्यायी इंधनांच्या स्रोतांबाबत संशोधन वेगाने चालू आहे.

iii) वायू, जैविक चिपाडे आणि इथेनॉल यांच्यापासून पर्यायी इंधने तयार करता येतात. 

iv) शेती, कारखाने आणि घरगुती वापरातल्या सेंद्रिय कचऱ्यापासून पर्यायी इंधन स्रोत तयार करता येतात.

v) गहू, मका, बटाटा किंवा ऊस यांच्यावर किण्वन प्रक्रिया केल्यास इथेनॉल मिळते. पेट्रोल किंवा डिझेलमध्ये इथेनॉल मिसळून त्याचा पर्यायी इंधन म्हणून वापर करता येतो.

vi) उसातून रस काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेल्या चिपाडांचा इंधन म्हणून बॉयलरमध्ये उपयोग करता येतो.

vii) बायोगॅस संयंत्रात सेंद्रिय कचऱ्याचे व गुरांच्या शेणाचा किण्वन प्रक्रियेने बायोगॅस निर्मितीमध्ये वापर करता येतो.

viii) सौर ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांपासून ऊर्जा, जलविद्युत अशा प्रदूषणकारी नसलेल्या आणि पुनर्नवीकरणीय पर्यायी ऊर्जास्रोतांचादेखील आता वापर करण्यात येतो.

Previous Post Next Post