अवशेषांगे म्हणजे काय, ते सांगून वनस्पती व मानव यांची दोन उदाहरणे लिहा

अवशेषांगे म्हणजे काय, ते सांगून वनस्पती व मानव यांची दोन उदाहरणे लिहा

अवशेषांगे म्हणजे काय, ते सांगून वनस्पती व मानव यांची दोन उदाहरणे लिहा.

किंवा

अवशेषांगे म्हणजे काय ? अवशेषांगाची उदाहरणे लिहा.

किंवा

अवशेषांगे म्हणजे काय? माणसातील चार अवशेषांची नावे लिहा.

उत्तर

I. अवशेषांगे : (1) ज्या अविकसित किंवा निरुपयोगी अशा संरचना प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीरात आढळून येतात, त्यांना अवशेषांगे असे म्हणतात. 

(2) हा एकच अवयव एका सजीवात उपयोगी, तर दुसऱ्या सजीवात निरुपयोगी असू शकतो.

II. वनस्पतीतील उदाहरणे : (1) इंडियन पाईप या वनस्पतीत आढळणारी शल्कपर्णे ही अवशेषांगे आहेत. या वनस्पतीत हरितद्रव्य नसल्याने ती प्रकाश-संश्लेषण करीत नाही व परजीवी जीवन जगते. 

(2) काही फुलांच्या पुंकेसरात परागकोश नसतात. असे पुंकेसर अवशेषांगे आहेत.

III. मानवातील उदाहरणे : (1) मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ, कानाचे स्नायू, अक्कलदाढ, माकडहाड इत्यादी अवशेषांगे आहेत.

Previous Post Next Post