कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा.
उत्तर
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यानें मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. त्यांनी वर्गसिद्धांत स्पष्ट केला आहे.
i) इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
ii) माणसामाणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात.
iii) समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो.
iv) मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात. तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली.