व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते ?
उत्तर
i) व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत मांडले.
ii) त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे म्हटले जाते.