आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर
आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये, पुढीलप्रमाणे आहेत.
i) ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
ii) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.
iii) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.
iv) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजाती वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.