अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे परिणाम लिहा

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे परिणाम लिहा

प्रश्न

 अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे परिणाम लिहा. 

उत्तर

 

 

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे अमेरिकेवर व जगावर झालेले परिणाम पुढीलप्रमाणे आहेत : 

i) जॉर्ज वॉशिंग्टन याने १३ वसाहतींच्या संघराज्याचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली. 

ii) जगाच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे संघराज्य पद्धतीचे राज्य अस्तित्वात आले. 

iii) अमेरिकन संघराज्याने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे जगात पहिल्यांदाच लोकशाही राज्यपद्धतीची स्थापना झाली. 

iv) अमेरिकेच्या या संघराज्यात्मक लोकशाहीची प्रेरणा जगातील अनेक राज्यांना मिळाली. 

v) अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा व स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येक मानवसमूहाला आहे, ही गोष्ट या स्वातंत्र्ययुद्धाने प्रस्थापित केली. 

vi) मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी जगात अनेक ठिकाणी लढे झाले. 

vii) अमेरिकेच्या लिखित स्वरूपात राज्यघटना तयार करण्याच्या प्रयोगाचे अनेक देशांनी अनुकरण केले. 

viii) अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले.

Previous Post Next Post