अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची माहिती लिहा

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची माहिती लिहा

प्रश्न

 अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची माहिती लिहा.

उत्तर

 

 

थॉमस जेफरसन याने तयार केलेला अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा वसाहतवाल्यांनी ४ जुलै १७७६ रोजी घोषित केला. या जाहीरनाम्यात पुढील विचार मांडण्यात आले होते :

i) सर्व माणसे जन्मतः समान आहेत. 

ii) निर्मात्याने मानवाला जीविताचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा शोध घेण्याचा हक्क असे काही हक्क बहाल केले आहेत. 

iii) हे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मानवाने 'सरकार' ही संस्था स्थापन केली. 

iv) या सरकारला लोकांच्या संमतीने सत्ता प्राप्त होते. 

v) एखादया सरकारने हे हक्क नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास असे सरकार बदलून नवे सरकार आणण्याचा हक्क जनतेला असतो. 

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने प्रत्येक मानवसमूहाला अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा व स्वातंत्र्याचा हक्क आहे, ही गोष्ट प्रस्थापित केली.

Previous Post Next Post