बहुविभाजनाने प्रजनन कसे होते ते स्पष्ट करा

बहुविभाजनाने प्रजनन कसे होते ते स्पष्ट करा

बहुविभाजनाने प्रजनन कसे होते ते स्पष्ट करा.

उत्तर 

बहुविभाजन : i) काही आदिकेंद्रकी पेशी, काही आदिजीव यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत बहुविभाजन या पद्धतीने प्रजनन होते. बहुविभाजन ही अलैंगिक प्रजनन पद्धती आहे. 

ii) प्रतिकूल परिस्थितीत अमिबा जीवनरक्षणासाठी पेशीपटलाभोवती जाड संरक्षक कवच तयार करतो. याला पुटी म्हणतात. 

iii) या पुटीमधील अमिबाच्या केंद्रकाचे पुनर्वृत्तीय विभाजन होते. 

iv) केंद्रक विभाजनानंतर पेशीद्रव्याचेही विभाजन होते. अनेक लहान लहान नवजात अमिबा पेशींची निर्मिती होते. यालाच बहुविभाजन म्हणतात. 

v) अनुकूल परिस्थितीत पुटी फुटते. 

vi) अनेक लहान लहान अमिबा पेशी बाहेर पडतात. प्रत्येक लहान अमिबा पेशीतून मोठा अमिबा तयार होतो.

Previous Post Next Post