कंपकुचित हालचाल म्हणजे काय

कंपकुचित हालचाल म्हणजे काय

1) कंपकुचित हालचाल म्हणजे काय?

2) वनस्पतीतील हालचालींचे प्रकार लिहून प्रत्येकी एक उदाहरण लिहा.

उत्तर 

(i) कंपकुचित हालचाल : लाजाळूसारख्या संवेदनशील वनस्पतीमध्ये स्पर्शाच्या उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात केलेल्या हालचालीला कंपकुचित हालचाल म्हणतात. (ii) वनस्पतींमधील हालचाली दोन प्रकारे होतात : (I) वृद्धी-संलग्न हालचाली (II) वृद्धी-असंलग्न हालचाली. 

उदाहरण : (i) वनस्पतींची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनाला प्रतिसाद देते; तर मूळ संस्था गुरुत्वाकर्षण आणि पाणी यांना प्रतिसाद देते. या वृद्धी-संलग्न हालचाली आहेत. (ii) स्पर्शाला प्रतिसाद म्हणून लाजाळूच्या पानांचे मिटणे, व्हीनस फ्लाय ट्रॅपचे बंद होणे या वृद्धी-असंलग्न हालचाली आहेत.

Previous Post Next Post