कोणत्या प्रकारच्या प्रजनन प्रक्रियेत परिवर्तन आढळते ते सांगून परिवर्तनाचे महत्त्व लिहा

कोणत्या प्रकारच्या प्रजनन प्रक्रियेत परिवर्तन आढळते ते सांगून परिवर्तनाचे महत्त्व लिहा

कोणत्या प्रकारच्या प्रजनन प्रक्रियेत परिवर्तन आढळते ते सांगून परिवर्तनाचे महत्त्व लिहा.

उत्तर

1) लैंगिक प्रजनन प्रक्रियेत परिवर्तन आढळते.

2) परिवर्तनाचे महत्त्व : i) लैंगिक प्रजननामध्ये दोन अर्धगुणी भिन्न युग्मकांच्या संयोगाने नवीन सजीवाची निर्मिती होते.

ii) त्यामुळे नवजात सजीव जनकाशी सर्वच बाबतींत साम्य दाखवत नाही. जननिक परिवर्तनामुळे नवजात सजीवात विविधता येते. 

iii) या विविधतेमुळे बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत होते.

iv) त्यामुळे प्रजातीचे अस्तित्व टिकून राहते. ती नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवते.

Previous Post Next Post