ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत

ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत

प्रश्न

 ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत ?

उत्तर

 

 

i) भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दैनिक परिवलन गती आणि उपग्रहाची भ्रमणगती यांची दिशा एकच असते. तसेच उपग्रहाच्या भ्रमणगतीचा आवर्तकाल पृथ्वीच्या दैनिक परिवलन गतीच्या आवर्तकालाएवढा असतो. त्यामुळे त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थितीही स्थिर राहते. 

ii) हे उपग्रह कधीही ध्रुवीय प्रदेशावरून जात नाहीत, तर विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात. त्यामुळे भूस्थिर उपग्रह ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाहीत.


Previous Post Next Post