ओझोन थरात घट होण्याची कारणे लिहा

ओझोन थरात घट होण्याची कारणे लिहा

ओझोन थरात घट होण्याची कारणे लिहा. 

उत्तर 

i) ओझोन थरातील घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे क्लोरोफ्लुओरोकार्बन्स (सीएफसी) चे रेणु. 

ii) क्लोरोफ्लुओरोकार्बनच्या रेणूमध्ये क्लोरीनचे व फ्लूओरिनचे अणू असतात. यांचा ओझोनबरोबर रासायनिक संयोग होतो. 

iii) 1995 पुर्वी सीएफसी वापर शीतयंत्रे, शीतगृहे आणि वातानुकूलन यंत्रांत केला जात असे. 

iv) कारखान्यातील द्रावके, एरोसोल्स, हॉस्पिलमधील जंतुनाशके, फोम इत्यादींमध्ये सीएफसी असतो. तेथून तो वातावरणात निसटतो. 


Previous Post Next Post