निकटदृष्टिता हा दोष असलेला माणूस अंतर्गोल भिंगांचा चष्मा वापरतो

निकटदृष्टिता हा दोष असलेला माणूस अंतर्गोल भिंगांचा चष्मा वापरतो

प्रश्न

 निकटदृष्टिता हा दोष असलेला माणूस अंतर्गोल भिंगांचा चष्मा वापरतो.

उत्तर

 

 

i) निकटदृष्टिता या दोषात जवळच्या वस्तूकडील प्रकाशकिरण दृष्टिपटलावर एकवटतात व त्यामुळे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. परंतु दूरच्या वस्तूकडील प्रकाशकिरण दृष्टिपटलाच्या अलीकडे एकवटतात व त्यामुळे त्या वस्तू स्पष्ट दिसू शकत नाहीत.


ii) अशा वेळी अंतगोल भिंगांचा चष्मा लावल्यामुळे दूरच्या वस्तूकडील प्रकाशकिरण अंतर्गोल भिंगाकडून योग्य प्रमाणात अपसारित होतात व नेत्रभिंगावर पडतात. नंतर ते नेत्रभिंगाकडून दृष्टिपटलावर एकवटले जातात. अशा रितीने अंतर्गोल भिंगांचा चष्मा वापरून निकटदृष्टिता हा दोष दूर करता येतो.



Previous Post Next Post