प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या पोषणाच्या मूलभूत पायऱ्या कोणत्या

प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या पोषणाच्या मूलभूत पायऱ्या कोणत्या

प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या पोषणाच्या मूलभूत पायऱ्या कोणत्या ? 

उत्तर : 

सर्व प्राण्यांमध्ये समान असणाऱ्या पोषणाच्या मूलभूत पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत :

(1) अंतर्ग्रहण : अन्न शरीराच्या आत घेण्याच्या प्रक्रियेला अंतर्ग्रहण असे म्हणतात.

(2) पचन : जटिल कार्बनी पदार्थाचे साध्या द्रावणीय पोषद्रव्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. रासायनिकरीत्या दातांच्या साहाय्याने यांत्रिकरीत्या आणि विकरांच्या साहाय्याने पचनाच्या प्रक्रिया होत असतात. 

(3) अवशोषण : पचन पूर्ण झालेली द्रावणीय पोषद्रव्ये रक्तात शोषून घेण्याच्या क्रियेला अवशोषण असे म्हणतात.

(4) सात्मीकरण : शोषलेल्या पोषद्रव्यांचे रक्तावाटे शरीरातील सर्व पेशी व ऊतींकडे वहन होते. या पोषद्रव्यांपासून ऊर्जानिर्मिती होते, वाढ व विकास तसेच भविष्यातील तरतूद म्हणून ही सात्मीकरण झालेली पोषद्रव्ये वापरली जातात.

(5) बहिःक्षेपण : पचन किंवा शोषण न झालेले उर्वरित अन्न शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला बहिःक्षेपण असे म्हणतात.

Previous Post Next Post