ई-कचरा म्हणजे काय? ई-कचऱ्याची थोडक्यात माहिती दया

ई-कचरा म्हणजे काय? ई-कचऱ्याची थोडक्यात माहिती दया

ई-कचरा म्हणजे काय? ई-कचऱ्याची थोडक्यात माहिती दया. 

उत्तर

i) इलेक्ट्रॉनिक कचऱ्याला ई-कचरा असे म्हणतात.

ii) इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापरानंतर अशी साधने नादुरुस्त झाल्यावर ई-कचरा निर्माण होतो.

iii) टाकाऊ संगणक, दूरदर्शन संच, छपाई यंत्र, फॅक्स यंत्र, मोबाईल, ध्वनी उपकरणे, निमवैदयकीय उपकरणे अशा साधनांमुळे ई-कचरा निर्माण होतो.

iv) ई-कचरा पर्यावरणास आणि मानवी आरोग्यास धोकादायक असतो.

v) ई-कचऱ्यामुळे माती आणि जमिनीच्या पृष्ठभागावरील पाण्यात शिसे आणि इतर रसायने मिसळली जातात.

vi) ई-कचऱ्याचे पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि पुनर्रचना केल्यास, त्याचे गांभीर्य कमी होते.

Previous Post Next Post