झेल्या ही व्यक्तिरेखा थोडक्यात लिहा

झेल्या ही व्यक्तिरेखा थोडक्यात लिहा

 'झेल्या' या कथेतील झेल्या या विद्याथ्र्या भावविश्व व्यंकटेश माडगूळकरांनी कसे चित्रित केले ते लिहा ?

किंवा 

'झेल्या' या विद्याथ्र्या भावविश्व थोडक्यात रेखाटा ?

किंवा 

'झेल्या' ही व्यक्तिरेखा थोडक्यात लिहा ?

उत्तर 

व्यंकटेश माडगूळकरांनी लिखित 'झेल्या' ही कथा 'माणदेशी माणसं' या पुस्तकातील आहे. ही कथा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील भावबंध उलगडून दाखवणारी आहे. माणदेशातल्या निंबवडे गांवामद्धे महिन्याला पंचवीस रुपये पगार घेऊन तीन महिने ज्ञानदानाचे पुण्यकर्म शिक्षकांनी हाती घेतले आहे. त्यांच्या शाळेतील मुलगा म्हणजे 'झेल्या' ही व्यक्तिरेखा होय. झेल्या हा एका लोहारांच्या घरामध्ये वाढलेला होता. 

झेल्याचे संपूर्ण नाव जालंदार एकनाथ लोहार होते. झेल्या हा उनाडकी करणारा, नेहमी खोटे बोलणारा, शाळेमध्ये सतत गेेरहजर राहणारा, नको त्या खोड्या करणारा मुलगा म्हणून त्याची ओळख होती. शिक्षणव्यवस्थेतील एका रागीट शिक्षकाने शिक्षा केली म्हणून शिक्षणावर पाणी सोडणारा मुलगा म्हेेस, ओढा, चिंचा आणि इतर खोड्यामध्ये जीवन व्यतीत करणारा होता. पण त्या शिक्षकांच्या तीन महिन्याच्या बदलीवर आलेल्या प्रेमळ गुरुजींमुळे झेल्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलून जाते. 

झेल्याचे व्यक्तिमत्त्व म्हणजे बटण नसलेला कुडता, एका हाताने गळ्याशी धरून बिथरल्या खोंडासारखा उभा, अंगानं किरकोळ शरीरयष्टी, वयाने जेमतेमच, तेरा-चोेदा वयाचा, डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगामध्ये कसले कसले डाग पडलेले मळलेले, बाहीवर ठिगळ लावलेले, हातमागाच्या कापडाचे कुडते. त्याला शोभणारी तांबड्या रंगाची चोेकडे असलेली गादीपाटाची चड्डी, तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले, त्यात चिंचा भरलेल्या आहेत. त्याचे दात काळे आणि किडलेले असे स्वभावचित्र म्हणजे झेल्या होय. 

शाळेच्या पहिल्या दिवशीच गुरुजीपूढे झेल्या उभा असतो. वड्यामध्ये चिंचा पाडत असताना मुलांनी त्याला पकडून आणले होते. शाळेत क येत नाहीस ? या गुरुजीच्या प्रश्नांचे उत्तर घरची म्हेेस व वडील शाळेत जावू नको म्हणतात म्हणून खोटेपणाचे सांगणे, यातून त्याचा उनाडपणा, गुंडगिरी, धाडसीवृत्ती, आत्मविश्वास या गुणांची ओळख शिक्षकाला होते. झेल्याला त्याच्या खिशातील चिंचा काढण्यासाठी प्रेमळपणाने गुरुजी सांगतात. शाब्बास जालंदर ! गुरुजींचे ऐकणारा शहाण मुलगा शिक्का पहिल्याच दिवशी पडतो. 'सिंदबादची गोष्ट' या गोष्टीमध्ये सर्व मुले रंगून गुंगलेले आहेत. पण झेल्या मात्र कोणाच्या तरी दप्तराच्या फडक्याचे टोक त्यांची गाठ तो हलक्या हाताने मारत आहे. त्याला वेगळाच विलक्षण आनंद वाटतो. 

शाळेमध्ये खोड्या, उनाडकी करणारा म्हणजे 'झेल्या' असे समीकरण झाले होते. पण झेल्याची शाळा नियमित चालू झाली होती. शिक्षकांच्या वागणुकीकरण तो खुप खुश होता. झेल्या मुळात एक चुणचुणीत विद्यार्थी होता. हे शिक्षकाने हेरले होते. त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार मात्र चांगले झाले नाहीत. आणि अगोदरच्या रागीट शिक्षकांच्या धोरणामुळे देखील तो वाया गेला. खोड्यात सुद्धा बुद्धीची चमक आहे, कल्पकता आहे हे जाणून शिक्षकांनी त्याच्या मनोवस्थेला पटेल असे मार्गदर्शन केले. पुढे तो शिक्षकांच्या चांगला गुणीशिष्य बनला. 

शिक्षकाच्या एकलकोंडीत झेल्या साथीदार झाला. शिक्षकाला मनापासून सर्व गोष्टीची मदत करत होता. मुक्कामाला असतांना त्यांच्या बालबुद्धीला पडलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्याचे कार्य शिक्षक करत होते. पण कधी कधी प्रश्न वेेचारिक पातळीचे असल्यामुळे शिक्षक ही चिंतेत पडत होते. ते प्रश्न म्हणजे गांधी की जय, चळवळीचे, एकोणिसे बेचाळीस चाळीसचे देशातील स्वातंत्र्याचे प्रश्न होते. त्याला महापुरुषांचा बालमनातच आदर होता. 

'झेल्या' शिक्षकांच्या कामामध्ये प्रामाणिकपणे मदत करतो. उदा; लाकूडफाटा घेऊन येणे, पाण्याशी कळशी आणून देणे, सकाळ-संध्याकाळ दूध आणून देणे, शिक्षकाच्या प्रेमापोटी झेल्या संपूर्ण कामे करून शिक्षणाची गोडी वाढवत होता; पण जो शिक्षक तीन महिन्याच्या बदलीवर निंबवड्याच्या शाळेत आला होता त्याचे तीन महिने संपून गेले होते. ते रागीट शिक्षक आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू होणार होते. पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी शिक्षकांची पुन्हा वणवण भकंती होणार होती. 

शिक्षकांनी प्रेमळपणे झेल्याला त्याच्या बदली संदर्भात खोटे सांगितले पण ते झेल्याचा बाल बुद्धीला पटते होते. शेवटी शिक्षक शाळा सोडून निघाले विद्यार्थ्यानी व गावकऱ्यांनी निरोप दिला. चार मुले वेशीपर्यंत सोडायला आली. 'झेल्या' मात्र एक पिशवी घेऊन शिक्षकांच्या पाठीमागे निघाला. निंबवड्याची हद्द संपली. पालवी जडलेल्या पिंपरणीखाली उभा राहिलेला शिक्षक झेल्याच्या हातातून पिशवी घेऊन त्याला माघारी जाण्यास सांगतात. त्याच्या पाठीवरून प्रेमळ हात फिरवल्यामुळे झेल्या रडतो. त्याला समजावून शिक्षक पाठवून देतात. याचे दु:ख शिक्षकालाही होते आणि विद्यार्थ्याला तर खूपच होते. त्यामुळे हो कथा शोकात्मक रूप धारण करते.

Previous Post Next Post