मुद्रणकलेच्या इतिहासाबद्दल माहिती मिळवा

मुद्रणकलेच्या इतिहासाबद्दल माहिती मिळवा

मुद्रणकलेच्या इतिहासाबद्दल माहिती मिळवा.

उत्तर 

मुद्रणकलेचा अर्थ - मुद्रण अर्थात छपाई म्हणजे कागदावर शाई - वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची क्रिया होय. मुद्रण हा सामान्यतः व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून प्रकाशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.

मुद्रणकलेचा इतिहास - मुद्रण कला या तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते. तत्पूर्वी प्रती निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले. छपाई करण्यासाठी मजकुराचा एक साचा घडवला जाई. या साच्याला शाई लावली जाई. हा साचा कागदावर दाबून मजकुराची प्रत तयार केली जात असे. याच पदधतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रती मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. चर्चने बायबलच्या छपाईवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न गेला. परंतु हे शक्य झाले नाही व छपाईचे तंत्र सर्वदूर पसरत गेले.

Previous Post Next Post