स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 

उत्तर

कारण - 

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 

ii) स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. 

iii) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तसेच 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानल्या गेल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

Previous Post Next Post