ग्लुकोजचे विविध मार्गांनी होणारे विघटन स्पष्ट करा

ग्लुकोजचे विविध मार्गांनी होणारे विघटन स्पष्ट करा

ग्लुकोजचे विविध मार्गांनी होणारे विघटन स्पष्ट करा.

उत्तर 

i) ग्लुकोज हा 6 कार्बन अणूंचा रेणू आहे. याचे पेशीद्रव्यात विघटन होते.

ii) पेशीद्रव्यात विघटन होत असताना या प्रक्रियेला ऑक्सिजनची गरज नसते. या प्रक्रियेत 3 कार्बन अणूंचा रेणू पायरुवेट तयार होतो. 

iii) किण्वात पायरुवेटचे रूपांतर इथेनॉल व कार्बन डायऑक्साइडमध्ये किण्वन क्रियेने होते. या रासायनिक क्रियेला ऑक्सिजनची आवश्यकता नसते. 

iv) मानवी स्नायूत ऑक्सिजनविरहित विघटन झाल्यास त्यापासून लॅक्टिक आम्ल तयार होते. तर ऑक्सिजनच्या सान्निध्यात तंतुकणिकांमध्ये 38 ATP चे रेणू तयार होतात व कार्बन डायऑक्साइड व पाणी निर्माण होते.




Previous Post Next Post