बोस्टन टी पार्टी ची माहिती लिहा

बोस्टन टी पार्टी ची माहिती लिहा

'बोस्टन टी पार्टी'ची माहिती लिहा.

उत्तर 

i) इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी इंग्लंडच्या संसदेने १७७३ साली संमत केलेल्या कायदयाने कंपनीला अमेरिकेशी चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी प्राप्त झाली. 

ii) इंग्लंडने चहावर जकात कर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तेराही वसाहतींत तीव्र असंतोष निर्माण झाला.

iii) चहाच्या पेट्यांनी भरलेल्या तीन जहाजांपैकी 'डार्ट माऊथ' हे जहाज २७ नोव्हेंबर १७७३ रोजी बोस्टन बंदरात आले.

iv) वसाहतींनी त्या जहाजास परत जाण्यास सांगितले; परंतु ही मागणी अमान्य झाली. 

v) आठ हजार लोकांचा जमाव 'ओल्ड साऊथ चर्च' येथे जमला. 

vi) मोहॉक इंडियनांचा पोशाख करून शिस्तीने हे लोक गटागटाने जहाजावर चढले व त्यांनी जहाजातील चहाच्या पेट्या समुद्रात टाकल्या. १६ डिसेंबर १७७३ रोजी बोस्टन बंदरात घडलेल्या या घटनेस 'बोस्टन टी पार्टी' असे म्हणतात.

Previous Post Next Post