इंग्रजांनी भारतात आपला व्यापार वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न केले

इंग्रजांनी भारतात आपला व्यापार वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न केले

इंग्रजांनी भारतात आपला व्यापार वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न केले?

उत्तर

इंग्रजांनी भारतात आपला व्यापार वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न केले : 

i) भारतात कमी किमतीला माल विकत घ्यावयाचा व तो भरमसाठ दराने युरोपात विकायचा, असे धोरण इंग्रज व्यापाऱ्यांनी सुरुवातीस अवलंबिले. 

ii) भारतात कंपनीची अधिसत्ता असल्याने साम-दाम-दंड अशा अनेक अवैध मार्गांनी भारतीय माल कमी किमतीत खरेदी करणे ब्रिटिश व्यापाऱ्यांना शक्य झाले. 

iii) औदयोगिक क्रांतीनंतरच्या काळात इंग्लंडचा माल व भारतीय माल यांच्यात स्पर्धा होऊ लागली; अस्त्र वापरले. 

iv) डाक्क्याहून मलमलचे कापड इंग्लंडमध्ये निर्यात होत असे व भारतातून इंग्लंडकडे होणारी ही निर्यात थांबावी म्हणून ब्रिटिशांनी जकातीचे दर क्रमशः वाढवीत नेले. 

v) मलमलची निर्यात पूर्णपणे बंद पाडण्यात येऊन, उलट इंग्लंडमधून यंत्रमागावर तयार होणारे कापड भारतात आयात होण्यास सुरुवात झाली.

Previous Post Next Post