अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची कोणतेही चार कोणती स्पष्टीकरणासह लिहा

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची कोणतेही चार कोणती स्पष्टीकरणासह लिहा

प्रश्न

 अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची कोणतेही चार कोणती स्पष्टीकरणासह लिहा. 

उत्तर

 

 

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची कारणे खालीलप्रमाणे :

i) तणावाला सुरुवात : पॅरिस तहाने इंग्लंडला मिळालेला कॅनडा आणि अँपलशियन पर्वत व मिसिसिपी नदीच्या दरम्यानचा प्रदेश इंग्लंडने रेड इंडियनांसाठी राखून ठेवल्याने अँपलशियन पर्वतापलीकडे पश्चिम दिशेने पुढे सरकण्याच्या वसाहतींच्या इच्छेवर बंधन आल्याने वसाहतवाले संतप्त झाले.

ii) नवे कर: इंग्लंडच्या संसदेने १७६४ साली संमत केलेला शुगर अँक्ट, १७६५ सालचा स्टॅम्प अँक्ट आणि १७६७ सालचा आयात करविषयक कायदा यांमुळे वसाहतींत तीव्र असंतोष निर्माण झाला.

iii) बोस्टनची कत्तल :  तिसऱ्या जॉर्जने इंग्लंडच्या काही फौजा प्रथम न्यूयॉर्कमध्ये व नंतर बोस्टन बंदरात ठेवल्या. इंग्रज सरकारच्या या सैन्याची अमेरिकेतील उपस्थिती हे तणावाचे मुख्य कारण होते. ५ मार्च १७७० रोजी बोस्टन येथे झालेल्या चकमकीत काही वसाहतवाल्यांची कत्तल झाली. 

iv) बोस्टन टी पार्टी: वसाहतींसाठी १७७३ साली चहावर जकात कर लावण्याच्या इंग्लंडच्या निर्णयाने वसाहतवाले संतप्त झाले. बोस्टन बंदरास लागलेल्या 'डार्ट माऊथ' जहाजातील चहाच्या पेट्या समुद्रात फेकून वसाहतींनी या कायदयाला विरोध केला.

Previous Post Next Post