रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला ?
उत्तर
इतिहासलेखनात रेने देकार्त यांनी पुढील मताचा आग्रह धरला.
i) इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे.
ii) एखादी गोष्ट सत्य आहे असे नि:संशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये.