फ्रेंच राज्यक्रांतीचे जागतिक इतिहासाच्या संदर्भात असलेले महत्त्व स्पष्ट करा

फ्रेंच राज्यक्रांतीचे जागतिक इतिहासाच्या संदर्भात असलेले महत्त्व स्पष्ट करा

फ्रेंच राज्यक्रांतीचे जागतिक इतिहासाच्या संदर्भात असलेले महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेल्या खालील अनेक महत्त्वपूर्ण विचारांमुळेच जागतिक इतिहासाच्या संदर्भात ही क्रांती महत्त्वपूर्ण मानली जाते :

i) ही राज्यक्रांती जरी राजसत्तेविरुद्ध असली, तरी तिची मूळ प्रेरणा समाजात सामाजिक समता प्रस्थापित करणे हीच होती. 

ii) या क्रांतीने फ्रान्समधील अनियंत्रित राज्यसत्ता संपली व युरोपातील सरंजामशाहीला कायमचा शह बसला. 

iii) अनियंत्रित राजेशाही नष्ट करता येते, हा धडा जगाला दिला. 

iv) प्रजासत्ताकाची तत्त्वप्रणाली जगाला दिली. 

v) या क्रांतीमुळे जनतेच्या सार्वभौमत्वाचे तत्त्व हे आधुनिक जगाच्या समाजजीवनाचे मूलभूत तत्त्व बनले. 

vi) अनियंत्रित राजेशाही ही अनैतिक असते, हे तत्त्वही या क्रांतीने कायमचे प्रस्थापित केले. 

vii) स्वातंत्र्य, समता, बंधुता, घटनात्मकता, लोकशाही ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. 

viii) जगातील परतंत्र देशांना ही राज्यक्रांती नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. फ्रेंच राज्यक्रांती ही एक युगप्रवर्तक घटना मानली जाते.

Previous Post Next Post