खालील मुद्द्यांच्या आधारे हिटलरचा नाझीवाद स्पष्ट करा

खालील मुद्द्यांच्या आधारे हिटलरचा नाझीवाद स्पष्ट करा

खालील मुद्द्यांच्या आधारे हिटलरचा नाझीवाद स्पष्ट करा :

(अ) वंश श्रेष्ठत्वाचा पुरस्कार (ब) साम्यवादाला व लोकशाहीला विरोध (क) ज्यू-विरोध (ड) लष्करवाद. 

उत्तर 

'माईन काम्फ' या हिटलरच्या आत्मचरित्रातील हिटलरची विचारप्रणाली ही 'नाझीवाद' म्हणून ओळखली जाते. नाझीवादाची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत :

(अ) वंशश्रेष्ठत्वाचा पुरस्कार : नाझीवाद असे मानतो की, (१) जर्मन लोक हे शुद्ध नॉर्डिक (आर्य) वंशाचे आहेत. (२) हाच वंश जगातील सर्वश्रेष्ठ वंश असल्याने सर्व जगावर सत्ता गाजवण्याचे सामर्थ्य व नैतिक अधिकार जर्मन लोकांना आहे. (३) या श्रेष्ठ वंशीयांचे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी सर्व जर्मन भाषिक लोकांनी व्यापलेला प्रदेश जर्मनीच्या ताब्यात आणणे अगत्याचे आहे.

(ब) साम्यवादाला व लोकशाहीला विरोध : (१) साम्यवादी तत्त्वज्ञान जर्मनीच्या प्रगतीला पोषक नाही, म्हणून जर्मनीतील साम्यवादाची पाळेमुळे खणून काढणे हे नाझीवादाचे उद्दिष्ट होते. (२) नाझीवादाचा लोकशाही पद्धतीला विरोध होता, कारण सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी देशाच्या हिताचे निर्णय तातडीने घेऊ शकत नाहीत. त्यांची तशी बौद्धिक पात्रताही नसते. (३) लोकशाहीपेक्षा एका प्रभावशाली व्यक्तीच्या हातातील एककेंद्री शासन देशाला अधिक उपकारक ठरते, अशी नाझीवादाची धारणा होती.

(क) ज्यू-विरोध : ज्यूंविषयी आत्यंतिक द्वेष व चीड हा नाझीवादाचा अविभाज्य भाग होता. ज्यूंचा नायनाट करण्यावर नाझीवादाचा विशेष भर होता, कारण- (१) जर्मनीतील ज्यूंच्या मनात जर्मनीविषयी प्रेम नाही. (२) ज्यू लोकांच्या स्वार्थी व धनलोलुप वृत्तीमुळे जर्मनीवर पराभवाचे संकट कोसळले. (३) जर्मनीवरील ज्यूंचा प्रभाव नष्ट केल्याखेरीज जर्मनीची उन्नती होणार नाही, अशी हिटलरची धारणा होती.

(ड) लष्करवाद : (१) व्हर्सायच्या कराराने केलेला अन्याय धुऊन काढून जर्मनीला जागतिक राजकारणात प्रतिष्ठा मिळवून देणे, हे नाझीवादाचे ध्येय होते. (२) त्यासाठी नाझीवाद लष्करवादाचा पुरस्कार करतो.

Previous Post Next Post