पहिल्या महायुद्धाचे परिणाम लिहा

पहिल्या महायुद्धाचे परिणाम लिहा

पहिल्या महायुद्धाचे परिणाम लिहा.

उत्तर

११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपलेल्या पहिल्या महायुद्धाचे जगावर झालेले तात्कालिक व दूरगामी परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:

i) सुमारे १ कोटी सैनिक मारले गेले. त्यात अमेरिकेचे एक लाखावर सैनिक आणि जगभरातील लाखो नागरिक यांचा समावेश आहे. जखमींची संख्या मृतांच्या दुप्पट होती. 

ii) तरुण पिढी मारली गेल्यामुळे युरोपच्या भविष्यावर दूरगामी परिणाम झाले. 

iii) विनाशकारी शस्त्रांच्या वापरामुळे नागरी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. 

iv) नागरी मालमत्ता मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली; तसेच व्यापार व उद्योग पूर्णपणे थंडावले. 

v) अमेरिका व जपान वगळता जित व जेती अशा दोन्ही प्रकारची राष्ट्रे दिवाळखोर बनली. 

vi) युद्धोत्तर काळात युरोपच्या नकाशाची पुनर्रचना करण्यात येऊन युरोपात अनेक नवे देश अस्तित्वात आले. 

vii) 'राष्ट्रसंघ' ही आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात आली. तिच्यामार्फत लहानमोठ्या अशा सर्व राष्ट्रांचे स्वातंत्र्य व प्रादेशिक एकात्मता अबाधित राहील, याची हमी देण्यात आली. 

viii) पहिल्या महायुद्धानंतर राजकीय, लष्करी व आर्थिक सत्तेची केंद्रे युरोपातून अमेरिकेकडे गेली.

Previous Post Next Post