पुढील अवयवांची कार्ये लिहा

पुढील अवयवांची कार्ये लिहा

पुढील अवयवांची कार्ये लिहा 

I) बीजाणुधानी व कुक्षी

उत्तर  

बीजाणुधानी : 1) कवकामधील बीजाणू निर्माण करणाऱ्या संरचनेला बीजाणुधानी म्हणतात. 

2) बीजाणुधानीमध्ये बीजाणुनिर्मिती होते. 

3) बीजाणू परिपक्व झाल्यावर बीजाणुधानी फुटते, बीजाणू बाहेर पडतात आणि पसरतात.

कुक्षी : 1) स्त्रीकेसरामधील कुक्षीवृंताच्या टोकाच्या भागाला कुक्षी म्हणतात. 

2) कुक्षी चिकट असते. त्यामुळे कुक्षीवर परागकण स्थलांतरित होऊन रुजतात.

II) अंडाशय व परागकोश

अंडाशय : 1) स्त्रीकेसराच्या मुळाशी असणाऱ्या फुगीर भागाला अंडाशय म्हणतात. 

2) अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे तयार होतात. 

3) अंडाशयातील प्रत्येक बीजांडात एक स्त्रीयुग्मक (अंडपेशी) तयार होते.

परागकोश : 1) पुंकेसराच्या टोकाला असलेल्या भागाला परागकोश म्हणतात. परागकोश सामान्यतः द्विपाली असतात. 

2) परागकोशात परागकणांची निर्मिती होते. परागकण पुंयुग्मकांची निर्मिती करतात.

III) वृषण आणि शुक्राशय व प्रोस्टेट ग्रंथी

 वृषण : 1) वृषण हे मानवी पुरुष प्रजनन संस्थेचे मुख्य अवयव आहेत. वृषण उदरगुहेबाहेर वृषणकोशात असतात.

2) वृषण शुक्राणूंची निर्मिती करतात.

शुक्राशय व प्रोस्टेट ग्रंथी : 1) शुक्राशय आणि प्रोस्टेट ग्रंथी वीर्य नावाचा चिकट द्रव पदार्थ तयार करतात. 

2) वीर्य शुक्राणूंचे पोषण करते. वीर्य शुक्राणूंच्या हालचालींना मदत करते.

IV) योनी व गर्भाशय.

योनी : 1) योनी हा स्त्री-प्रजनन संस्थेचा प्रमुख अवयव आहे. योनी ही योनीमार्ग आणि गर्भाशयापर्यंत असणारी स्नायुमय नलिका आहे. 

2) योनी मासिक व शरीराबाहेर टाकते. 

3) योनीमधून स्त्रीच्या शरीरात शुक्राणूंचा प्रवेश होतो. 

4) मूल जन्माच्या वेळी आईच्या योनीमधून बाहेर येते.

गर्भाशय : 1) गर्भाशय हा स्त्री-प्रजनन संस्थेचा स्नायुयुक्त अवयव आहे. 

2) गर्भाशयाचे स्नायू मजबूत असतात. गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन-प्रसरण पावण्याची क्षमता असते. यामुळे मूल गर्भाशयात वाढू शकते. 

3) गर्भाशयाचे स्नायू मूल जन्माच्या वेळी ते शरीराबाहेर ढकलण्यास मदत करतात.

Previous Post Next Post