मानवी फलन, विकास आणि जन्म या क्रियांचे स्पष्टीकरण लिहा

मानवी फलन, विकास आणि जन्म या क्रियांचे स्पष्टीकरण लिहा

मानवी फलन, विकास आणि जन्म या क्रियांचे स्पष्टीकरण लिहा.

उत्तर 

1. फलन : (1) योनीमार्गात शुक्राणूंचा प्रवेश झाल्यावर ते गतिमान होतात. आपल्या कशाभिकेसमान शेपटीच्या मदतीने ते अंडवाहिनीमधून अंडपेशीपर्यंत पोहोचतात.

(2) शुक्राणूद्वारे अंडपेशीचे फलन होते. त्यांच्या संयोगाने युग्मनज तयार होतो.

2. विकास : (1) या युग्मनजामध्ये पुनर्वृत्तीय विभाजन होते. त्यापासून अनेक पेशी

तयार होतात.

(2) त्यानंतर हा पेशींचा गोळा गर्भाशयाच्या भित्तिकेवर स्थापन होतो. गर्भाशयात या भ्रूणाचा विकास होतो. भ्रूणाला पोषकद्रव्ये आणि ऑक्सिजनचा पुरवठा नाळेद्वारे आईच्या रक्तातून होतो.

3. जन्म : (1) नऊ महिन्यांच्या विकासानंतर मूल जन्म घेण्यास सिद्ध होते. ते हळूहळू खाली सरकते.

(2) हळूहळू गर्भाशय ग्रीवा मोठी होते. मूल योनीमार्गातून बाहेर येते.

Previous Post Next Post