दोन प्रकारच्या चेता कोणत्या? त्यांची कार्ये लिहा.
उत्तर
1) अभिवाही आणि अपवाही या दोन प्रकारच्या चेता आहेत.
2) कार्ये : (i) अभिवाही चेता संवेदांगांपासून मेंदूपर्यंत चेता आवेगांचे वहन करतात. यांना संवेदी चेता असेही म्हणतात.
(ii) अपंवाही चेता मेंदूपासून शरीरात इतरत्र, स्नायूंकडे किंवा संवेदांगांकडे चेता आवेगांचे वहन करतात. यांना प्रेरक चेता असेही म्हणतात.