उद्योग स्वाध्याय

उद्योग स्वाध्याय

उद्योग स्वाध्याय

उद्योग स्वाध्याय इयत्ता आठवी 


प्रश्न. 1. अचूक पर्यायांसमोरील चौकटींत अशी खूण करा.

1) औदयोगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही.

i) पाणी

ii) वीज

iii) मजूर

iv) हवा  


2) खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे ?

i) यंत्रसामग्री उदयोग

ii) पुस्तकबांधणी उद्योग  

iii) रेशीम उद्योग

iv) साखर उद्योग 


3) खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही?

i) जुनी दिल्ली  

ii) नवी दिल्ली

iii) नोएडा

iv) बंगळूरू


4) उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनवार्य आहे ?

i) आयकर

ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व  

iii) वस्तू व सेवा कर

iv) विक्री कर


प्रश्न. 2. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा. 

1) देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. 

उत्तर :

हे विधान असत्य आहे

देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना साहाय्यक ठरतात.


2) देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे. 

उत्तर :

हे विधान सत्य आहे.


3) औदयोगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उदयोगधंदयांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे.

उत्तर :

हे विधान सत्य आहे.


4) उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंदयासाठी अनिवार्य आहे.

उत्तर :

हे विधान सत्य आहे.


प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार ओळींत लिहा.

1) औदयोगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात ?

उत्तर :

i) देशाच्या आर्थिक विकासात उदयोगांचे स्थान महत्त्वाचे आहे. 

ii) शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. 

iii) औद्योगिक क्षेत्रासाठी उद्योगांना वीज, पाणी, कर यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. या सुविधा सरकारकडून उपलब्ध होतात. 


2) औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

i) उद्योगांच्या निर्मिती आणि विकासाचे देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे स्थान असते. 

ii) औद्योगिक विकास हा राष्ट्रीय विकासावर परिणाम करतो. म्हणून देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे.


3) उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा. 

उत्तर :

i) उदयोजक व्यक्ती अथवा उद्योगसमूहाने सामाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. 

ii) उद्योग क्षेत्राने आपल्या नफ्यामधील दोन टक्के रक्कम मागासवर्गीय जनतेच्या विकासासाठी खर्च करण्याबाबतची योजना सुरू केली आहे. 

iii) उद्योग क्षेत्राने या समाजातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दयावे. यामधून उद्योजक निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावे. मागासवर्गीय गरीब विदयार्थांना कमवा व शिका या संकल्पनेच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे, यासाठी शाळा सुरू कराव्या, अनुसूचित जाती, जमाती वर्गाबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती या वर्गासाठी सुद्धा उद्योगक्षेत्राने सामाजिक दायित्व निधीतून योजना राबवाव्या. विविध योजनांच्या माध्यमातून निर्माण होणे महत्त्वाचे आहे. यादृष्टीने उद्योग क्षेत्राने नियोजन करावे.


4) लघु उद्योगाची तीन वैशिष्ट्ये सांगा. 

उत्तर :

लघु उद्योगाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -

i) कमी भांडवल - लघु उद्योग हा कमीत कमी भांडवलात सुरू केला जातो. 

ii) कमी मजूर संख्या - या उद्योगासाठी कमी मजूर संख्या असली तरी हा उद्योग घरगुती स्वरूपात केला जातो.

iii) साधी निर्मिती प्रक्रिया - या उद्योगाची निर्मिती प्रक्रिया साधी असते. यामध्ये कमीत कमी यंत्रांचा वापर केला जातो.


प्रश्न. 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) औदयोगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 

उत्तर :

औदयोगिक विकासावर पुढील घटक परिणाम करतात.

i) भांडवल - उद्योगधंदयाच्या स्थापनेसाठी भांडवल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आधुनिक वस्तुनिर्माण जगात, भांडवल गुंतवणूक ही केवळ उत्पादनांकरिता नसून त्यांची गरज मोठ्या प्रमाणात विपणन क्रियेसाठी असते. जमिनीच्या व साहित्याच्या खरेदीसाठी, कामगारांच्या वेतनासाठी आणि वस्तुच्या जाहिरातीसाठी भरपूर भांडवल लागते. वस्तुनिर्माण उदयोगधंदयात आवश्यक भांडवल, सरकारी अनुदान, बँका, शेअर बाजार आणि परकीय चलनातून प्राप्त केले जाते.

ii) मजूर - बहुतेक सर्वच वस्तुनिर्माण उद्योगात मजुरांची गरज असते. मजुरांचे दोन प्रकार आहेत. कुशल व अकुशल मजुरांची उपलब्धता ही अंतर, वेळ, गुणवत्ता, कुशलता व वेतन यावर आधारित असते. शहरी भाग कुशल व अकुशल मजुरांना आकर्षित करतात.

iii) वाहतूक - उदयोगधंदयाच्या स्थापनेत वाहतुकीची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. वाहतूक हा मुख्य घटक आहे की, ज्याद्वारे उदयोगधंदयात कच्चा माल आणि बाजारपेठेत पक्का माल पुरविला जातो. वाहतुकीची तीन माध्यमे आहेत. वाहतूक सुविधांची उपलब्धता सहजपणे झाल्यास उदयोगधंदयांची वाढ जलद होते.

iv) बाजारपेठ - बाजारपेठ हे असे ठिकाण आहे की जेथे ग्राहकांना वस्तुंचा पुरवठा उपलब्ध केला जातो. वाहनउद्योग, काचउदयोग, अन्नप्रक्रिया करणाऱ्या उदयोगांची स्थापना वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी बाजारपेठेलगत केली जाते. ग्राहकाभिमुख उदयोग प्रामुख्याने बाजारपेठे लगत विकसित होतात. 


2) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा.

उत्तर :

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकाससंस्था आहे. ही संस्था राज्यात औद्योगिक विकासाची वृद्धी व्हावी याकरता महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे. या महामंडळाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. 

i) तंत्रज्ञान व लघुउद्योजकांन तयार छपऱ्या वा गाळे पुरविणे व त्यांचे उपक्रम प्रस्थापण्यात मदत करणे. या प्रकारे महामंडळ उत्तेजन देते. 

ii) औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधणे, औद्योगिक व नागरी वृद्धीसाठी मोठ्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे. 

iii) सरकारी आणि निमसरकारी अभिकरणांसाठी ठेव अभिदान तत्त्वावर प्रकल्प बांधणे इ. कामे महामंडळ करते. 

iv) याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देते.


3) माहिती तंत्रज्ञान उदयोगाचे महत्त्व सांगा.

उत्तर :

माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. 

i) माहिती तंत्रज्ञान उदयोग ही अभियांत्रिकीची शाखा असून तिचा उपयोग संगणकाद्वारे केला जातो. माहिती संग्रहित करणे, शोधून काढणे व पुढे पाठविण्याचे काम या शाखेत केले जाते. 

ii) यातील महत्त्वाचे क्षेत्र संपादन, प्रक्रिया संग्रहण आणि शाब्दिक चित्रे, मूळ ग्रंथांचे व सांख्यिकी माहितीचे विश्लेषण करून सूक्ष्म इलेक्ट्रॉनिकच्या आधारे संगणक व दूरसंपर्क साधनांद्वारे पाठविली जातात. 

iii) माहिती तंत्रज्ञानाचे स्पष्टीकरण म्हणजे संगणकावर आधारित माहिती प्रणालीचे, विशेष करून माहिती घालणे व संगणकीय यंत्रणेबाबत, आकृतिबंध, विकसन उपयोजन आणि व्यवस्थापन करणे होय. 

iv) आज संगणकीकृत व तंत्रज्ञानीय घटकांची वाढ बरीच झाली आहे. विविध प्रकारांमध्ये माहिती ही संगणकात संग्रहित केली जाते व तिचा जगभर वापर केला जातो. या माहिती प्रसारणासाठी कोणतेही भौगोलिक अडथळे येत नाहीत. 

v) नवीन पिढी यातील नवी क्षेत्रे स्वीकारत आहेत. जसे की, संगणकीय जाळी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, वैश्विक माहिती प्रणाली, क्लाऊड कम्प्युटिंग इ. या उद्योगात उच्च, कुशल मजूरवर्ग आवश्यक असतो. 

vi) अलिकडील काळात माहिती तंत्रज्ञानाची क्षेत्रे वाढली आहेत. भारतात या उद्योगास पूरक परिस्थिती लाभल्याने अनेक क्षेत्रे वाढली आहेत. म्हणूनच परदेशीकृत कंपन्या वाढल्या आहेत.


4) भारतातील लोकसंख्येचा विचार करता उदयोग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा.

उत्तर :

i) लोकसंख्या ही देशाची साधनसंपत्ती आहे. बुद्धिमत्ता ही मानवी क्षमता निश्चित करते. देशातील साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी त्या देशातील मनुष्यबळ उपयुक्त असतात. 

ii) मनुष्य हा अत्यंत क्रियाशील प्राणी असून आपल्या गरजा भागविण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या सेवा यांच्यामध्ये आमुलाग्र बदल करावा लागतो. 

iii) भारतात ज्या भागात लोकसंख्या जास्त आहे त्या भागात अनेक उदयोगधंदे निर्माण झाले आहेत. 

iv) नवनवीन उद्योगांची स्थापना होत असल्यामुळे लक्षावधी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत. अर्थातच देशाचा आर्थिक विकास होऊन राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. 

v) विकसित उद्योगधंद्यांमुळे वाढत्या लोकसंख्येतील प्रशिक्षित लोकांना रोजगार उपलब्ध होऊन अंतर्गत व्यापाराचे क्षेत्र वाढविता येणे शक्य होते. अर्थातच अंतर्गत व्यापार वाढल्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. 


प्रश्न. 5. खालील विधानासाठी ओघतक्ता तयार करा. 

1) आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेल्या प्रवास लिहा. 

उत्तर :


2) एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. 

उत्तर :


प्रश्न. 6. फरक स्पष्ट करा. 

1) मध्यम उद्योग - अवघड उद्योग

उत्तर :

मध्यम उद्योग

अवघड उद्योग 

 

i) मध्यम उद्योगात सयंत्र व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक ₹ 5 कोटीपासून जास्त व ₹10 कोटीपर्यंत असते..

ii) मध्यम उद्योगात कमी भांडवल व कमी कामगार संख्या असते. 

iii) या उद्योगाला जास्त लहान किंवा जास्त मोठी जागा लागत नाही.

iv)या उदयोगात निर्मिती प्रक्रिया साधी असते.

v) या उद्योगात फळप्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ उद्योग यांचा समावेश होतो.

 

i) अवजड उद्योगात सयंत्र व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक ₹10 कोटीपासून जास्त असते.

ii) अवजड उद्योगांना जास्त भांडवल व जास्त कामगार संख्या असते. 

iii) या उद्योगाला भरपूर मोठी जागा लागते.

iv) या उद्योगांमध्ये निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची असते.

v) या उद्योगात सिमेंट उद्योग, साखर उद्योग, लोह पोलाद उद्योग इ. उद्योगाचा समावेश होतो.


2) कृषीपूरक उद्योग - माहिती तंत्रज्ञान उद्योग

उत्तर :

कृषीपूरक उद्योग

माहिती तंत्रज्ञान उद्योग

 

i) शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या अर्थाजनासाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषीपूरक उद्योग केले जातात.

ii) या व्यवसायात बरेच व्यवसाय करू शकतो. जसे की, गायी म्हशी पालन, शेळी पालन कुक्कुट पालन, मधुमक्क्षी पालन, मत्स्य पालन असे अनेक व्यवसाय केले जातात. 

iii) या उदयोगात शिक्षित तसेच अशिक्षित मजूर काम करतात.

iv) या व्यवसायात भौगोलिक अडथळे येतात. 


i) माहिती तंत्रज्ञान उद्योग हा अभियांत्रिकीची शाखा असून याच क्षेत्रातील पदवीधर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.

ii) नवीन पिढी यातील नवीन क्षेत्रे स्वीकारत आहेत. जसे की, संगणकीय जाळी तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान वैश्विक माहिती प्रणाली, क्लाऊड कम्प्युटिंग इ.

iii) या उद्योगात उच्च, कुशल मजूरवर्ग, तसेच उच्च पदवीधरांची आवश्यकता आहे. 

iv) या माहिती प्रसारणासाठी भौगोलिक अडथळे येत नाहीत. 

Previous Post Next Post