राज्यशासन स्वाध्याय

राज्यशासन स्वाध्याय

राज्यशासन स्वाध्याय 

राज्यशासन स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन .................... येथे होते. 

अ) मुंबई

ब) नागपूर 

क) पुणे 

ड) औरंगाबाद

उत्तर :

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. 


2) राज्यपालाची नियुक्ती ..................... कडून होते. 

अ) मुख्यमंत्री 

ब) प्रधानमंत्री

क) राष्ट्रपती 

ड) सरन्यायाधीश

उत्तर :

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती कडून होते. 


3) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा आधिकार .................. यांना असतो. 

अ) मुख्यमंत्री

ब) राज्यपाल

क) राष्ट्रपती 

ड) सभापती

उत्तर :

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा आधिकार राज्यपाल यांना असतो. 


प्रश्न. 2. तक्ता पूर्ण करा. 

अ.क्र. 

सभागृहे

कार्यकाल 

सदस्य संख्या 

निवडणुकीचे स्वरूप 

प्रमुख 

 1. 

विधानसभा

 

 

 

 

 2. 

विधान परिषद

 

 

 

 

उत्तर :

अ.क्र. 

सभागृहे

कार्यकाल 

सदस्य संख्या 

निवडणुकीचे स्वरूप 

प्रमुख 

 1. 

विधानसभा

 5 वर्षे

288  

प्रत्यक्ष लोकातून निवडणुकीद्वारे 

विधानसभा अध्यक्ष 

 2. 

विधान परिषद

कायमस्वरूपी

78  

निर्वाचित  

सभापती 


प्रश्न. 3. टिपा लिहा. 

1) राज्यपाल 

उत्तर :

घटकराज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते पदावर राहतात. 

विधानपरिषदेने व विधानसभेने संमत केलेला विधेयकाचे राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतर होते. 

विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. 


 2) मुख्यमंत्र्यांची कार्य 

उत्तर :

मुख्यमंत्र्यांची कार्ये खालीलप्रमाणे -

मंत्रिमंडळाची निर्मिती : बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री आपले मंत्रिमंडळ तयार करतात. 

खातेवाटप : विधानसभा सदस्याचे राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, लोकमताची जाणीव, नेतृत्व इ. बाबींचा विचार करून खातेवाटप केले जाते. 

खात्यामध्ये समन्वय : सरकार चालवताना वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय साधून कारभाराची एक दिशा ठरवावी लागते. हे काम मुख्यमंत्री करतात. 

राज्याचे नेतृत्व : मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या, अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणाची निर्मिती मुख्यमंत्री करतात. 


प्रश्न. 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) विधानसभेच्या अध्यक्षाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर :

विधानसभेच्या सभेचे अक्षयक्षपद भूषवणे, सभेचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे, कामकाजाची कार्यक्रमपत्रीका तयार करणे, बेशिस्त वर्तन करणाऱ्या सभासदांना निलंबीत करणे. 


2) संविधानाने भारतासाठी संघराज्यव्यवस्था का स्वीकारली ?

उत्तर :

भारताचा भौगोलिक विस्तार फार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिनसी आहे. भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूपात यात विविधता आहे. अशा वेळेस एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही, हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली आहे. 


3) खातेवाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो. 

उत्तर :

मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करावे लागते. खातेवाटप करतानाही मंत्र्यांना राजकीय अनुभव, प्रशासकीय अनुभव, कौशल्य, लोकमताची जाण, नेतृत्व इ. बाबींचा विचार करावा लागतो. 

Previous Post Next Post