सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय
सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(महात्मा गांधी, खुदा-ई-खिदमतगार, रॅम्ये मॅक्डोनाल्ड, सरोजिनी नायडू)
1) लंडनमध्ये ................... यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
उत्तर :
लंडनमध्ये रॅम्ये मॅक्डोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
2. खान अब्दुल गफारखान यांनी ............... या संघटनेची स्थापना केली.
उत्तर :
खान अब्दुल गफारखान यांनी खुदा-ई-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली.
3. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ................... यांनी केले.
उत्तर :
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले.
4. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ................... उपस्थित होते.
उत्तर :
दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते.
2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली.
उत्तर :
पेशावर शहरांवरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले; परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला; म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली.
2) सोलापुरात सरकारने 'मार्शल लॉ' म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.
उत्तर :
सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. ६ मे १९३० रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेचे पोलिस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले. यांच्या निषेधार्थ सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.
3) पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली.
उत्तर :
पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासनपद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली.
4) गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.
उत्तर :
गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्या नुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.
3. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.
1) गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले ?
उत्तर :
लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी, ही प्रमुख मागणी होती; परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले.
2) राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली ?
उत्तर :
गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात आले तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने अटक केली. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केलि. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेर एप्रिल १९३४ मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली.
प्रश्न. 4. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा.
उत्तर :