भूगोल बोर्ड प्रश्नपत्रिका

भूगोल बोर्ड प्रश्नपत्रिका

 


1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा :

1) भारताचे स्थान पृथ्वीवर ................. गोलार्धात आहे. 

i) उत्तर व पूर्व

ii) दक्षिण व पश्चिम

iii) उत्तर व पश्चिम

iv) दक्षिण व पूर्व

उत्तर :

भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. 


2) ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या .................... वाऱ्यांपासून पाऊस पडतो. 

i) मान्सूनवारे

ii) पूर्वीय (व्यापारी)

iii) प्रतिव्यापारी

iv) आवर्त

उत्तर :

ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून पाऊस पडतो. 


3) भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था ................. प्रकारची आहे. 

i) अविकसित

ii) विकसित

iii) अतिविकसित

iv) विकसनशील

उत्तर :

भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. 


4) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ....................

i) मैदानी प्रदेश आहे

ii) उच्चभूमीचा आहे

iii) पर्वतीय आहे

iv) विखंडित टेकड्यांचा आहे

उत्तर :

ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे


2. योग्य जोड्या जुळवा :


 'अ' स्तंभ

'ब' स्तंभ  

 

1) क्षेत्रभेट

2) पिको दी निब्लीना

3) सर्वाधिक नागरीकरण

4) रिओ दी जनेरिओ 

 

i) पर्यटन स्थळ

ii) गोवा

iii) नमुना प्रश्नावली

iv) हिमाचलप्रदेश

v) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

उत्तर :

 'अ' स्तंभ

'ब' स्तंभ

 

1) क्षेत्रभेट

2) पिको दी निब्लीना

3) सर्वाधिक नागरीकरण

4) रिओ दी जनेरिओ 

 

iii) नमुना प्रश्नावली

v) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

ii) गोवा

i) पर्यटन स्थळ


3. एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

1) ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात ?

उत्तर :

ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोण नावाने संबोधतात. 


2) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता ?

उत्तर :

ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. 


3) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ?

उत्तर :

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राज्यस्थान आहे.


4) भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते ?

उत्तर :

भारताची प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्त रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. 


5) भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे ?

उत्तर :

भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह शेती प्रकारची आहे. 


4. अ) तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांचे नावे द्या व चिन्हांची सूची द्या (कोणतेही चार ):

1) सिक्कीम

2) लक्षद्वीप बेटे

3) चेन्नई बंदर

4) आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई

5) दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य

6) कर्कतृत्व


आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

प्रश्न :

1) ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा. 

उत्तर :

i) विषुववृत्तीय वने

ii) उष्ण गवताळ प्रदेश 

iii) दलदलीचा प्रदेश

iv) उष्ण पानझडीची वने 

v) काटेरी झुडपी वने

vi) समशीतोष्ण गवताळप्रदेश


2) नकाशात दर्शविलेले बेट कोणते ?

उत्तर :

नकाशात दर्शविलेले माराजाॅ बेट


3) नकाशात मगर कोठे आढळते ?

उत्तर :

नकाशात मगर पॅटेनल आढळते


4) तामरिन हा प्राणी कोठे आढळून येतो ?

उत्तर :

तामरिन हा प्राणी अँमेझाॅनच्या खोऱ्या आढळून येतो 


5) नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता ?

उत्तर :

नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश पंपास गवताळ प्रदेश आहे.


5. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) :

1) भारतात पानझडी वने आढळतात. 

उत्तर :

i) 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशांत वने आढळतात. 

ii) भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण 1000 मिमी ते 2000 मिमी आहे. 

iii)  उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) वनस्पतीची पाने गळून पडतात. परिणामी भारतात पानझडी वने आढळतात.


2) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. 

उत्तर :

i) पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अँमेझाॅन नदीखोऱ्यात सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे. 

ii) पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे. 

iii) पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.   


3) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. 

उत्तर :

i) खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे. 

ii) भारताला एकूण सुमारे 7500 किमीचा सागरी किनारा लाभला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीला वाटा जवळपास 40% आहे. 

iii) आहरातील एक घटक, रोजगारनिर्मिती, पोषणस्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळण्याकरिता मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो. 

iv) देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. 

v) केरळ, पश्चिम बंगाल, ओडिश, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे.   


4) ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. 

उत्तर :

i) दुर्गमता

ii) घनदाट अरण्ये

iii) सुप्त खनिज साठ्यांसंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा. 


6. अ) खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

ब्राझील-नागरी लोकसंख्येची टक्केवारी (1960 ते 2010 )

 वर्षे 

नागरी लोकसंख्येची टक्केवारी  

1960

1970 

1980 

1990 

2000 

2010 

47.1 

 56.8 

66.0 

74.6 

81.5

84.6

प्रश्न :

1) वरील आलेख काय दर्शवितो ?

उत्तर :

ब्राझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी


2) कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो ?

उत्तर :

2000 ते 2010 दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो. 


3) 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे ?

उत्तर :

1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत 8.6 टक्क्याने वाढ झाली आहे. 


आ) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :



प्रश्न :

1) 2016 ला भारतातील सरासरी आयुर्मान किती ?

उत्तर :

2016 ला भारतातील सरासरी आयुर्मान 68 आहे. 


2) 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे ?

उत्तर :

1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा  7 ने जास्त आहे. 


3) 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान ही ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते ?

उत्तर :

1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान ही ब्राझीलमध्ये 1960 वर्षी होते.


4) 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे ?

उत्तर :

2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ ब्राझील देशात जास्त आहे.


5) कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे ?

उत्तर :

ब्राझील देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे. 


6) 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षानी कमी होते ?

उत्तर :

1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा 13 वर्षानी कमी होते. 


7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

1) तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल ? वन क्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. 

उत्तर :

i) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बिण इत्यादी. 

ii) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. 

iii) क्षेत्रभेटीच्या हेतुनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. 

iv) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतीचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकण्याचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी. 

1. वनक्षेत्राचे नाव काय आहे ?

2. वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते ?

3. वनक्षेत्राचे क्षेत्रफळ किती आहे ?

4. या वनात कोणते प्राणी आढळतात ?  


2) भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा. 

उत्तर :

भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :

i) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. 

ii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 

iii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. 

iv) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सोेम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.


3) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत: 

i) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.

ii) हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे असमपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे. 

iii) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात. 

iv) अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.

v) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन' म्हणतात. व्हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 

vi) उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश 'थरचे वाळवंट' किंवा 'मरुस्थळी' या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. 

vii) अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.

viii) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.

   

Previous Post Next Post