विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - 2 बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - 2 बोर्ड प्रश्नपत्रिका


1. अ) योग्य पर्याय निवडून उत्तराचा पर्याय क्रमांक लिहा :

i) हाडांमध्ये ...................... हे अमिनो आम्ल असते. 

अ) मेलॅनिन

ब) हिमोग्लोबीन

क) ऑस्सिन

ड) इन्सुलिन

उत्तर :

हाडांमध्ये ऑस्सिन हे अमिनो आम्ल असते. 


ii) 'शेकरू खार' हे धोक्यात आलेल्या ................... प्रजातीचे उदाहरण आहे. 

अ) संकटग्रस्त

ब) दुर्मिळ

क) संवेदनशील

ड) अनिश्चित

उत्तर :

'शेकरू खार' हे धोक्यात आलेल्या अनिश्चित प्रजातीचे उदाहरण आहे. 


iii) मानव हा प्राणी ................... वर्गात येतो. 

अ) सस्तन

ब) उभयचर

क) सरीसृप

ड) चक्रमुखी

उत्तर :

मानव हा प्राणी सस्तन वर्गात येतो. 


iv) मरणोत्तर ...................... या मानवी अवयवाचे दान करता येते. 

अ) त्वचा

ब) ह्रदय

क) फुफ्फुस

ड) हाडे

उत्तर :

मरणोत्तर फुफ्फुस या मानवी अवयवाचे दान करता येते. 


v) ज्वालामुखी ही .................... प्रकारची आपत्ती आहे. 

अ) सामाजिक

ब) राजकीय

क) जैविक

ड) भूगर्भीय

उत्तर :

ज्वालामुखी ही भूगर्भीय प्रकारची आपत्ती आहे. 


ब) खालील प्रश्न सोडवा :

i) वेगळा घटक ओळखा :

भूकंप, पूर, त्युनामी, युद्ध

उत्तर :

युद्ध


ii) खालील विधान चूक की बरोबर ते लिहा :

ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते. 

उत्तर :

चूक 


iii) सहसंबंध ओळखा व दुसरी जोडी पूर्ण करा :

पश्चिम घाट : आशियाई सिंह :: सुंदरबन अभयारण्य : ........................

उत्तर :

पश्चिम घाट : आशियाई सिंह :: सुंदरबन अभयारण्य : वाघ


iv) औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोणते इंधन वापरले जाते ?

उत्तर :

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळसा हे इंधन वापरले जाते. 


v) चित्र ओळखून नांव लिहा. 



उत्तर :

हास्य मंडळ


2. अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) :

i) पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. 

उत्तर :

i) पेशी विभाजन हा सजीवांतील महत्त्वाचा गुणधर्म होय. 

ii) पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो. म्हणजेच प्रजनन संस्था मुख्यत: पेशी विभाजनावर आधारित आहे. 

iii) याबरोबरच बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ पेशी विभाजनाच्या मदतीनेच होते. उदा. अनेक पेशींची मिळून ऊती तयार होते व ऊतींपासून मानवी संस्था तयार होतात. 

iv) शरीराच्या झीज भरून काढण्यासाठीही पेशींचे विभाजन साहाय्य करते. 

v) या सर्व कारणामुळे पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म होय.   


ii) झुरळ ह्या प्राण्याचा संधिपाद ह्या संघात समावेश होतो. 

उत्तर :

i) संधिपाद प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. 

ii) शरीर त्रिस्तरीय, द्वीपार्श्व, सममित खंडीभूत असते. 

iii)  शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते. 

 

iii) नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरणस्नेही आहे. 

उत्तर :

i) कोळशावर चालणाऱ्या विद्युतनिर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायुवर चालणाऱ्या संचाची कार्यसमता अधिक असते. 

ii) त्याप्रमाणे नैसर्गिक वायुमध्ये सल्फट नसल्याने त्यांच्या ज्वलनातून पदूषणही कमी होते. 


ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतीही तीन) :

i) खालील आकृती पूर्ण करा :

उत्तर :


ii) जादवं मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध मिळतो ?

उत्तर :

जादव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस केवळ कामगार असलेल्या पयांगना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांची जाण होती. यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे दाखवले.

अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले, तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते, हे महत्त्वाचे सत्य जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपल्याला समजते.


iii) फरकाचे दोन मुद्दे स्पष्ट करा :

लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन

उत्तर :

 लैगिक प्रजनन

अलैगिक प्रजनन 

 

i) युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात. 

ii) लैगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. 

iii) हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्थसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. 

iv) या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकापेक्षा वेगळा असतो.   

 

 i) कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. 

ii) अलैगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. 

iii) हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. 

iv) या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकासारखा (क्लोन) असतो. 


iv) जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशांस म्हणतात ? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे द्या. 

उत्तर :

बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकाना जनुकीयदुष्ट्या उन्नत पिके म्हणतात. 

उदा. बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस. 


v) जीवनसत्त्वे म्हणजे काय ? त्यांचे दोन प्रकार लिहा. 

उत्तर :

जीवनसत्त्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्याची आवश्यकता असते. 

प्रकार : A, B, C, D, E, K.


3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतीही पाच) :

i) खालील चिन्हसंकेतांचे अर्थ स्पष्ट करा :

उत्तर :

1) कचरा कचरापेटीत टाकावा इतरत्र नाही. 

2) सायकल वापराने प्रदूषण होत नाही आणि आरोग्य चांगले राहते. इंधनाची बचत होते.  

3) पाणी वाचवा. 


ii) सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा. 

उत्तर :

i) हे प्राणी शीतरक्ती असतात. 

ii) शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. 

iii) यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. 

iv) शीर आणि धड यांच्यामध्येमान असते. बाह्यकर्ण नसतो. 

v) अंगुलींना नखे असतात. उदाहरणे : कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी.  


iii) 1) चीज कशापासून बनवले जाते ?

उत्तर :

चीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या गायीच्या दुधापासून तयार केले जाते.  


2) चीज निर्मितीमध्ये पूर्वी कोणते विकर वापरले जात होते ?

उत्तर :

जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेले रेनेट हे विकर वापरुन चीज तयार केले जाते. 


3) शाकाहारी चीज बनवतांना कोणते विकर वापरले जाते ?

उत्तर :

शाकाहारी चीज बनवतांना प्रोटिएज हे विकर वापरले जाते. 


iv) 1) खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखविली आहे ?

उत्तर :

खालील आकृतीमध्ये मूलपेशी उपचार पद्धती प्रक्रिया दाखविली आहे


ii) या प्रक्रियेचे महत्त्व लिहा. 

उत्तर :

जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसहल होते व त्याचे प्राण वाचू शकतात. 


iii) या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते ?

उत्तर :  

या प्रक्रियेने त्वचा, किडनी, यकृत, ह्रदय, नेत्र या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते


v) आपत्ती म्हणजे काय ? नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीची कोणतेही दोन उदाहरणे लिहा. 

उत्तर :

अकस्मात होणारा अपघात, मानवनिर्मित मुद्दामहून केलेली क्रिया किंवा नैसर्गिकरीत्या अकस्मात आलेले खूप रौद्र स्वरूपाचे संकट, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी होते त्याला 'आपत्ती' असे म्हणतात.

नैसर्गिक आपत्ती : पूर, भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी. 

मानवनिर्मित आपत्ती : युद्ध, आग, तेल गळती, अपघात, 


vi) डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावर घेण्यात आलेले आपेक्ष लिहा. 

उत्तर :

i) नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. 

ii) उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. 

iii) सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. 


vii) 


1) वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शविलेली आहे ?

उत्तर :

वरील आकृतीमध्ये जैवइंधन निर्मिती प्रक्रिया दर्शविलेली आहे. 


2) या प्रक्रियातून मिळणाऱ्या घनरूप व द्रवरूप इंधनांची दोन उदाहरणे लिहा. 

उत्तर :

घनरूप इंधन : दगडी कोळसा, पिकांचे अवशेष. 

द्रवरूप इंधन : वनस्पती तेल, अल्कोहोल. 


 viii) 1) पवन ऊर्जा निर्मिती मधील टप्पे दाखविणारा ओघतक्ता पूर्ण करा. 

उत्तर :


2) पवनऊर्जेपासून विद्युतनिर्मिती करतांना येणाऱ्या मर्यादा सांगा. 

उत्तर :

पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाने हवा सर्वत्र उपलब्ध नसते. 


4. खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा :

i) a) फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले दाखवा. 

उत्तर :


b) परागणाची व्याख्या लिहा. 

उत्तर :

परागकोषांतील परागकण हे स्त्रीकेशराच्या कुक्षीवर स्थानांवरील होतात. यालाच परागकण असे म्हणतात. 


c) परगण करणाऱ्या दोन घटकांची उदाहरणे द्या. 

उत्तर :

वारा, पाणी, किटक प्राणी. 


ii) तुम्ही काय कराल ?

1) तुमच्या बराच वेळ इंटरनेटसाठी खर्च होतो आहे. 

उत्तर :

एकदा वाया गेलेला वेळ परत कधीही भरून येत नाही. आपला वेळ अभ्यास, व्यायाम अथवा मैदानी खेळ यांसाठीच वापरणे योग्य आहे. फावल्या वेळात आई-बाबांना मदत करणे योग्य आहे. परंतु जर कामाशिवाय इंटरनेट वापरणे, अयोग्य व्हिडिओ पाहणे, संगणकावर किंवा मोबाइलवर गेम्स खेळत राहणे आणि फोनचा अतिवापर करणे अशा सवयी लागल्या की त्यांचेच व्यसन होते. त्यामुळे आपली ही सवय प्रयत्नपूर्वक कमी करू. आपला वेळ वाया चालला आहे हे ध्यानात ठेवू. त्या वेळात काही सकारात्मक व विधायक कामे करू.


2) शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. 

उत्तर :

तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे. हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगू. वेगवेगळ्या माध्यमांत तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारी चित्रे, फोटो उपलब्ध आहेत. ती त्या मुलाला दाखवू. त्याच्या पालकांना या सवयीविषयी सांगू. त्याचे व्यसन दूर करण्यासाठी प्रयत्न करू,


3) तुमची बहिण अबोल झाली आहे. 

उत्तर :

सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना विचार येत असतात. कधी कधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असते. यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही. तिच्याशी बोलत राहिले पाहिजे. तिच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून त्यांच्याबरोबर तिला मिळायला उदयुक्त केले पाहिजे. तिला जे आवडते असे छंद जोपासायला मदत केली पाहिजे. समुपदेशकाची मदत देखील घेता येईल.


4) तुमच्या घराभोवतालच्या रिकाम्या जागेचा सदुपयोग करायचा आहे. 

उत्तर :

घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग छोटीशी बाग बनवण्यासाठी करता येईल. त्यासाठी माती आणून तेथे रोपे लावता येतील. रोपांची नर्सरी सुरू करता येईल. तसेच छोटे मैदान बनवता येईल. बॅडमिंटनसारख्या खेळासाठी जाळी लावता येईल. या जागेची स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून तेथे कचरा फेकायला निर्बंध करता येईल.


5) बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे. 

उत्तर : 

बारावीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यांनी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येणे स्वाभाविक असते. यासाठी त्याने वेळेचे योग्य नियोजन करावे, एकेक विषयाचा एकाच वेळी विचार करावा, अभ्यासाच्या मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. 

घरातल्या लोकांशी मनमोकळे बोलावे. ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे. 'तुझ्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तू नाहीस' हे सत्य त्याला पटवून दयावे.

Previous Post Next Post