धाराविद्युत स्वाध्याय

धाराविद्युत स्वाध्याय

 



1. शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 




अ. घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडली आहेत ?

उत्तर :

घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडली आहे. 


आ. सर्व उपकरणांतील विभवांतर कसे असेल ?

उत्तर :

सर्व उपकरणांतील समान विभावांतर असेल. 


इ. उपकरणांतून जाणारी विद्युतधारा सारखीच असेल का ? उत्तराचे समर्थन करा. 

उत्तर :

आपणास माहित आहे की, I = V/R म्हणजेच विभवांतर (v) जरी समान असले तरी रोध (R) वेगळा असल्यास विद्युतधारा (I) वेगळी असते. म्हणून उपकरणांतून जाणारी विद्युतधारा सारखी असेलच असे नाही. 


ई. घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते ?

उत्तर :

एखादे उपकरण कार्य करत नसेल अथवा बंद पडले तरी इतर उपकरणे चालू राहतात. त्यामुळे विद्युत परिपथाची समांतर जोडणी केल्या जाते. 


उ. या उपकरणातील बंद T.V. पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडित होईल का ? उत्तराचे समर्थन करा. 

उत्तर :

उपकरणे समांतर जोडणीत रचले आहेत म्हणून TV बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडित होणार नाही. 


2. विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा. 


वरील परिपथाच्या साहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल ?

उत्तर :



3. उमेशकडे 15 व 30 रोध असणारे दोन बल्ब आहेत. त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत. परंतु त्याने ते बल्ब एक, एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर 

अ. त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील ?

उत्तर :

समांतर जोडणीने जोडावी लागतील 


आ. वरील (1) च्या उत्तरानुसार बल्ब जोडण्याच्या पद्धतीने गुणधर्म सांगा. 

उत्तर :

जर दिलेले रोध समांतर जोडणीत जोडले असतील तर 

i) जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्तांकाइतकी असते. 

ii) प्रत्येक रोधातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्तप्रमाणात असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधांतून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजेइतकी असते. 

iii) प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते. 

iv) रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किंमतीपेक्षा कमी असतो. 

v) ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात.   


इ. वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल ?

उत्तर :


4. खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व विभवांतर (V मध्ये) दिले आहे. 



अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा. 

उत्तर :


 
 आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे

i) स्वरूप कसे असेल ? (आलेख काढू नये)

उत्तर :

हा आलेख आरंभबिंदूतून (0,0) जाणारी सरळ रेषा असेल. 


ii) कोणता नियम सिद्ध होतो ? तो स्पष्ट करा. 

उत्तर :

5. जोड्या लावा. 

 'अ' समूह

'ब' समूह 

 1) मुक्त इलेक्ट्रॉन

अ) V / R

 2) विद्युतधारा

ब) परिपथातील रोध वाढवणे 

 3) रोधकता 

क) क्षीण बलाने बद्ध 

 4) एकसर जोडणी

ड) VA / LI

उत्तर :

 'अ' समूह

'ब' समूह 

 1) मुक्त इलेक्ट्रॉन

क) क्षीण बलाने बद्ध

 2) विद्युतधारा

अ) V / R

 3) रोधकता 

ड) VA / LI

 4) एकसर जोडणी

ब) परिपथातील रोध वाढवणे

 

6. 'X' एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध 'r' व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रभेट 'a' असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल ? तो कोणत्या एककात मोजतात ?

उत्तर :


7. रोध R1, R2, R3, आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2 या दोन काळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा. 





1) कळ S1 व S2 दोन्ही बंद केल्या. 

उत्तर :

2) दोन्ही कळ उघड्या ठेवल्या. 

उत्तर :


3) S1 बंद केली व S2 उघडी ठेवली. 


उत्तर :


8. X1, X2, X3 परीमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्माची यादी खाली दिली आहे. 

(I  - विद्युतधारा, V = विभवांतर, x - परिणामी रोध)







9. उदाहरणे सोडवा. 

अ. 1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6Ω आहे. तारेची लांबी 70cm केल्यास तारेचा रोध किती असेल ?

उत्तर :


आ. जर दोन रोध एकसर जोडणीने तर त्यांचा परिणामी रोध 80Ω होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20Ωहोतो. तर ट्या रोधांच्या किंमती काढा.  

उत्तर :

इ. एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युतप्रभार 5 मिनिटे वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल ?

उत्तर :

Previous Post Next Post