असहकार चळवळ स्वाध्याय

असहकार चळवळ स्वाध्याय

असहकार चळवळ स्वाध्याय

असहकार चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी

असहकार चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास


1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ................... या देशातून केली. 

अ) भारत 

ब) इंग्लंड 

क) दक्षिण आफ्रिका 

ड) म्यानमार

उत्तर :

गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली. 


2) शेतकऱ्यांनी ................... जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. 

अ) गोरखपूर 

ब) खेडा

क) सोलापूर 

ड) अमरावती

उत्तर :

शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. 


3) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ................... या किताबाचा त्याग केला. 

अ) लॉर्ड 

ब) सर 

क) रावबहादूर 

ड) रावसाहेब

उत्तर :

जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला.


2. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 

1) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली ?

उत्तर :

१९०६ मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते, तसेच त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. 


2) गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला ?

उत्तर :

गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह बिहारच्या चंपारण्य भागात केला. 


3) जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा आधिकारी कोण होता ?

उत्तर :

जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर होता. 


3. पुढील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दांत लिहा. 

1) सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा. 

उत्तर :

गांधीजींना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणले. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे, हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता काम नये, अशी गांधीजींची शिकवण होती. 


2) स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली ?

उत्तर :

राष्ट्रीय सभेतील अनेक नेत्यांना स्वातंत्र्यासाठी सरकारी कायदेमंडळात प्रवेश करणे गरजेचे वाटले. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अवडणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. १९२२ मध्ये राष्ट्रीय सभेच्याअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला. 

उत्तर :

रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला; कारण या कायद्यान्वये कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्या, न्यायालयात खटला न भारत तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्याला मनाई करण्यात आली. या कायद्यामुळे भारतीयांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला. भारतीयांनी या कायद्याला 'काळा कायदा' असे संबोधले. ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आव्हान करण्यात आले. 


2) गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. 

उत्तर :

गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली; कारण उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे फेब्रुवारी १९२२ मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिस चौकीला आग लावली. यात एका पोलिस अधिकाऱ्यासह २२ पोलिस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. १२ फेब्रुवारी १९२२ रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. 


3) भारतात सायमन कमिशवर बहिष्कार घातला. 

उत्तर :

१९१९ च्या मॉटेग्यू चेम्सफर्ड या कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या. त्यामुळे भारतीत जनतेत असंतोष होता. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने १९२७ मध्ये सर जॉन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता; म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 


4) भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली. 

उत्तर :

खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली, तिला 'खिलाफत चळवळ' असे म्हणतात. हिंदु-मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली, तरच सरकार निश्चितच वठणीवर येईल, असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदु-मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले.  

Previous Post Next Post