वस्तू स्वाध्याय

वस्तू स्वाध्याय

वस्तू स्वाध्याय

वस्तू स्वाध्याय इयत्ता दहावी

वस्तू स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी


1. आकृती पूर्ण क्ररा. 

अ.

उत्तर :

आ. 

उत्तर :

इ. 

उत्तर :


2. कारणे लिहा. 

अ. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ................

उत्तर :

कारण नंतरच्या काळातही त्याच आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. 


आ. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण .................. 

उत्तर :

कारण त्यांचे आयुष्य संपले असते. 


3. काव्यसौंदर्य

अ . कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा. 

वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते

असल्यासारखे वागलो तर वस्तू 

प्रचंड सुखावतात

उत्तर :

प्रस्तुत काव्यपंक्तीतून कवीने निर्जीव वस्तूंवर मानवी भावनांचा आरोप केला आहे. माणसाला मन असते. आपण दुसऱ्याचे मन जर दुखावले नाही तर तो सुखावत असतो. त्याचप्रमाणे मन नसलेल्या वस्तूंबरोबर आपण मन असलेल्या माणसाप्रमाणे वागलो तर त्या वस्तूंनाही खूप आनंद होतो व त्या सुखावतात. वस्तूंची आदळआपट न करता त्या प्रेमळपणे हाताळाव्यात. 


आ. 'वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची' याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा. 

उत्तर :

स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी आपण अंघोळ करतो. घर स्वच्छ ठेवण्यासाठी त्याची झाडझुड करतो. कपडे स्वच्छ ठेवण्यासाठी ते धुतो. आपण अंघोळ केल्यावर केस करतो आणि नीटनेटके राहतो. तसेच कपडेही धुतल्यानंतर नीटनेटके दिसावेत म्हणून त्यांना इस्त्री करतो. म्हणजे प्रत्येक वस्तूला आपण स्वच्छ ठेवत असतो असा माझा दृष्टिकोन आहे. 


इ. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा. 

उत्तर :

एकदा मी थोडीशी भाजी घेऊन घराकडे यायला निघालो. वाटेत एक खड्डा होता त्यात माझा पाय गेला आणि चपलेचा अंगठाच तुटला. त्यामुळं मला नीट चालतच येईना. रस्त्यावरून पाय घासत घासत चालत होतो. पण तेही जेमना शेवटी दोन्ही पायातल्या चपला काढून हातात घेतल्या आणि अनवाणी चालू लागलो. एका हातात भाजीची पिशवी आणि दुसऱ्या हातात चपला होत्या. तेवढ्यात माझ्या एका लांबच्या बहिणीनं मला आवाज दिला आम्ही हात हालवून बाय केलं . मीही माझा हात उंचावून अनवधानानंचपलांनी तिला बाय केले आणि कावराबावरा होऊन तसाच झपझप घरी आलो. चपलेचा अंगठा तुटल्यामुळे अशी माझी फजिती झाली. 


 4. तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. 

उत्तर :

आमचा वर्गमित्र शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे हे आम्हांला दिसताच आम्ही ताबडतोब धावत जाऊन त्याचा हात पकडू आणि त्याला बाहेर खेचू. पुन्हा जर असं केलंस तर मुख्याध्यापकांकडे तुझी तक्रार करून अशी त्याला धमकी देऊ.  

Previous Post Next Post