नागरीकरण स्वाध्याय
नागरीकरण स्वाध्याय इयत्ता नववी
नागरीकरण स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल
प्रश्न. 1. पुढील समस्येवर उपाय सुचवा.
1) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.
उत्तर :
उपाय - i) ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवासव्यवस्था शासनामार्फत वाढवावी.
ii) स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारनिमित्त शहरात येतात. या स्थलांतरित लोकांसाठी ते जेथे राहतात तेथे रोजगार निर्मिती व्हावी. तेथे लघुउद्योग, कुटिरोदयोग सुरू करून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यायाने ते स्थलांतरित होणार नाही व झोपडपट्ट्यांच संख्या वाढणार नाही.
ii) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना शासनांचा योजनेमार्फत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दयावी.
2) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.
उत्तर :
उपाय - i) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे रहदारी पोलिस खात्यांनी लक्ष केंद्रित करावे. त्यासोबत नागरिकांनी ही जागृक राहणे आवश्यक आहे.
ii) बहुतांश लोक प्रवासासाठी खाजगी वाहने वापरतात. जेथे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक बससेवा, रेल्वेसेवा वापरावी. त्यामुळे वाहतुक कोंडी होणार नाही.
iii) सर्वांनी रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळले तर वाहतुकीची कोंडी होणार नाही.
iv) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या आमाणात पुरेशा उपलब्ध व्हाव्यात.
3) नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उत्तर :
उपाय - i) स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते अवैध मार्गाने पैसे कमावतात. यासाठी तेथे शासानातर्फे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात.
ii) मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून चोरी, मारामाऱ्या, खून यांसारख्या गुन्ह्यांपासून परावृत्त करावे.
iii) पोलिस व न्याययंत्रणेमधील भ्रष्टाचाराला आळा घालावा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी. त्यामुळे गुन्हे घडण्यास आळा बसेल.
4) नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली.
उत्तर :
उपाय - i) आपल्या घरातील टिव्ही, संगीत प्रणाली इत्यादीचा आवाज कमी ठेवावा, लग्न समारंभात बँड, फटाक्यांचा वापर टाळावा.
ii) आपल्या परिसरातील घरे, कारखाने, वाहने इत्यादींतून होणारे धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. कचरा कचराकुंडीत टाकावा. तो जाळून त्याची विल्हेवाट लावू नये.
iii) विहिरी, तलाव आणि सार्वजनिक कचरा नळ योजनेजवळ टाकू नये. निर्माल्य, मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव धरणात टाकू नये.
iv) रासायनिक खतांऐवजी सेंद्रियखत वापरावे, पॉलिस्टरच्या कापडाऐवजी सुती कपड्यांचा वापर करावा, प्लॅस्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्या वापराव्या.
v) अधिकाधिक वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी.
vi) प्रदूषणासंबंधित सर्व कायदे माहित करून त्यांचे पालन सर्वांनी करावे.
5) नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
उत्तर :
उपाय - i) नागरी भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी सांडपाणी कचरा न अडकता वाहून जाईल अशी यंत्रणा तयार करावी. तसेच नागरिकांनीही यासंबंधी तत्पर असावे.
ii) सांडपाणी व कचऱ्याच्या ठिकाणी किटकनाशकांची फवारणी करावी. वेळोवेळी स्वच्छता करावी.
iii) नागरी भागात कचऱ्याची समस्या ही गंभीर समस्या आहे कचरा हा घराबाहेर जमा न करता कचरापेटीतच टाकावा. यामुळे रोग उद्भवणार नाही.
iv) प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावावी.
v) अशुद्ध पाण्यामुळे व अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांची नागरिकांना माहिती करून दयावी. त्यावर उपचारासाठी निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे.
प्रश्न. 2. योग्य जोड्या जुळवा.
|
|
|
अ) नागरीप्रदेश आ) नियोजनाचा अभाव इ) स्थलांतर ई) नागरीकरण |
उत्तर :
ई) नागरीकरण इ) स्थलांतर अ) नागरीप्रदेश आ) नियोजनाचा अभाव |
प्रश्न. 3. महत्त्व सांगा/ फायदे लिहा.
1) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण
उत्तर :
i) गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे.
ii) ग्रामीण भागांतील शेतीही आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले.
iii) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामुळे कामात सुसूत्रता व कमी वेळात जास्त काम होण्याची क्षमता वाढली.
2) व्यापार
उत्तर :
i) व्यापारामुळे व्यापार संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृह, इत्यादी सेवांची वाढ होते.
ii) या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात.
iii) व्यापारामुळे देशांदेशांमधील राजनैतिक, आर्थिक संबंध सुधारतात.
iv) तसेच राष्ट्रांचा आर्थिक विकास होतो. पर्यायाने लोकांचे जीवनमान सुधारते.
3) औद्योगिकीकरण
उत्तर :
i) औद्योगिकीकरणामुळे उद्योगांचा विकास व केंद्रीकरण झाले.
ii) उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या संधी निर्माण झाल्या.
iii) लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे.
iv) देशाचा आर्थिक विकास होत आहे.
v) नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होत आहे. नागरिकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ झाली आहे.
4) शहरातील सोईसुविधा
उत्तर :
i) वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोई अत्यंत महत्त्वाच्या असतात.
ii) चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोईमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो.
iii) शिक्षणाच्या सेवादेखील नागरी भागांमध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. मुख्यतः उच्च शिक्षणाच्या सोईमुळे इतर ठिकाणांहून अनेक विद्यार्थी नागरी भागांत येतात.
iv) तसेच वैद्यकीय सोईदेखील नागरी भागांत चांगल्या विकसित झालेल्या असतात.
5) शहरातील सामाजिक ऐक्य
उत्तर :
i) शहरात अनेक लोक रोजगारासाठी स्थलांतर करून येतात. हे लोक वेगवेगळ्या जाती, धर्माचे, पंथाचे असतात. हे सर्व लोक एकत्र राहतात. त्यांच्यात सर्वधर्म समभाव ही भावना निर्माण होते.
ii) वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातून सामाजिक ऐक्य निर्माण होते.
iii) शहरातील सण-उत्सवात सर्व धर्माचे, पंथांचे लोक एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यात सामाजिक ऐक्य निर्माण होते. त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होते.
प्रश्न. 4. पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा.
1) वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी
उत्तर :
|
|
|
|
2) औद्योगिकीकरण व वायूप्रदूषण
उत्तर :
ii) औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. iii) उदा. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे मुंबई महानगरचा भाग झाली आहे. |
3) स्थलांतर व झोपडपट्टी
उत्तर :
|
|
|
|
4) सोईसुविधा व वाढती गुन्हेगारी
उत्तर :
|
|
उदा. उच्च शिक्षणाच्या सोईमुळे तसेच नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक पुणे शहरात शिकायला येतात. |
|
प्रश्न. 5. खालील तक्ता पूर्ण करा.
नागरीकरण |
परिणाम |
|
|
|
उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. |
|
|
|
|
ग्रामीण ते शहर - बदल |
|
उत्तर :
नागरीकरण | परिणाम |
उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. | |
ग्रामीण ते शहर - बदल | सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायती ऐवजी नगरपरिषद / नगरपालिकेचा उदय. नागरिकांच्या विविध मूलभूत सर्वजनिक सेवा उपलब्ध |
प्रश्न. 6. स्पष्ट करा.
1) शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.
उत्तर :
i) शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राचीवाढ होय. औद्योगिकीकरण व खेड्यातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचा शहरीकरणात समावेश होतो. त्यामुळे शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.
ii) एखादया प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले.
iii) शहरे व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले.
iv) उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे शहरांकडे लोकांचे स्थलांतरण होऊन विशिष्ट पद्धतीने शहरांची वाढ होते.
2) तुमच्या कल्पनेतील सुनियोजित शहर
उत्तर :
माझ्या कल्पनेतील सुनियोजित शहर हे प्रदूषण मुक्त असेल. शहराची मांडणी अगदी साधी, सरळ असेल. मोजकी घरे, पाण्याच्या सुविधा (नळ, तलाव. विहिरी) असेल. शहरात बगीचा, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, रेल्वेटेशन, बस सुविधा, विमान सुविधा असेल. रस्ते स्वच्छ व विजेरी दिव्यांची सोय असणारी असेल. जागो जागी कचरा पेटीची सुविधा तसेच सांडपाण्याची सोय केलेली असेल. करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे असेल. माझ्या शहरात भ्रष्टाचार, चोरी याला स्थान मिळणार नाही.
3) औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो.
उत्तर :
i) औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावरील उदयोगधंदे सुरू झाले.
ii) एखाद्या प्रदेशांमध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे.
iii) औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंद्यात वृद्धी झाली. उद्योगधंदयांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते.
4) प्रदूषण- एक समस्या
उत्तर :
i) प्रदूषण म्हणजे घातक दुषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यतः प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो.
ii) प्रदूषणामध्ये वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यांचा समावेश होतो.
iii) शहरांचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यांमुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
iv) शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणातदेखील वाढ होते.
v) प्रदूषणामुळे अनेक आजार उद्भवतात जसे श्वसनाचे विकार, बहिरेपणा.
5) स्वच्छ भारत अभियान
उत्तर :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५० व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी 'स्वच्छ भारत अभियानाची' संकल्पना मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर २०१४ या दिवशी हातात झाडू घेऊन साफसफाई करत 'स्वच्छ भारत अभियानाचे' उद्घाटन केले. मोंदीनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. तर 'एक कदम, स्वच्छता की ओर' या घोष वाक्यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील असा आशय व्यक्त करण्यात आला. नरेंद्र मोदींनी इंडिया गेटमधून या राष्ट्रीय अभियानास प्रारंभ केला. पण, गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहने मोदी यांनी केले आहे.
स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण भारतातील अस्वच्छता दूर करणे हा असून याद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात करून जनतेच्या मनोवृत्तीत बदल घडून आणण्याचा प्रयत्न या अभियानात केला जात आहे.
प्रश्न. 7. खालील छायांचित्रांतील नागरीकरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा.
उतर :
1) वायूप्रदूषणावरील उपाय - i) घरे, फॅक्टरी, वाहने यांपासून निघणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा.
ii) फटाक्यांचा वापर करून नका.
iii) केरकचरा केराच्या कुंड्यांमध्ये टाका, जाळू नका.
iv) सर्वाना वायूप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा.
2) ध्वनी प्रदूषणावरील उपाय - i) टिव्ही आणि म्युझिक सिस्टमचा आवाज कमी ठेवा.
ii) गाडीचा हॉर्न क्वचितच वाजवा.
iii) लाउडस्पीकरच्या वापरास प्रोत्साहन देऊ नका.
iv) लग्नाच्या वरातीत बॅन्ड व फटाक्यांचा वापरू नका.
v) सर्वाना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा.
3) मृदा प्रदूषणावरील उपाय - i) रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा वापर करावा. पॉलिथिनच्या ऐवजी कॉटन, ज्युटचा वापर करावा.
ii) पॉलिथिनच्या पिशव्यांची विल्हेवाट योग्य त्या प्रकारे लावा.
iii) जास्तीत जास्त झाडे लावा.
iv) सर्वाना रासायनिक प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा.
v) सेंद्रीय शेतीचा वापर करणे, रासायनिक खते, किटकनाशके मर्यादित वापरावे.
4) जल प्रदूषणावरील उपाय - i) सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नये.
ii) पाण्याच्या सार्वजनिक पाइपांचा गैरवापर करू नका.
iii) फक्त अधिकृत जागेवरच पवित्र मूर्तीचे विसर्जन करा.
iv) सर्वाना जल प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा.
v) शाडूमातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरुन सात्विक आनंद घ्यावा.
vi) कारखान्यात दूषित पाणी प्रक्रिया करून नदीत सोडावे.