आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय इयत्ता दहावी

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी


1. पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. 

अ) 

उत्तर :


आ. 

उत्तर :







2. खाली मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. 

उत्तर :

1) आजीचे दिसणे : वयाची सत्तरावी ओलांडली तरी तिचा कणा ताठ होता. तिला काठीची गरज नव्हती. केस पांढरे व चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरी तिच्या चेहऱ्याची ठेवण अशी होती की तारुण्यात ती किती सुंदर असेल याची जाणीव व्हायची. सर्व दात शाबूत होते व मोत्यासारखे चमकत होते. 

2) आजीचे राहणीमान : पायात जुन्या वळणाऱ्या नालाच्या वहाणा, अंगात चोळी, हिरवं आणि लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं  गोंदण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का असे आजीचे राहणीमान होते. 

3) आजीची शिस्त : आजीनं घरच्या सर्व स्त्रियांना कामाच्या वाटण्या करून दिल्या होत्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, भांडी घासायची हे तिनं ठरवून दिलं होतं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं, प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे असा तिचा कटाक्ष होता. अशी आजीची शिस्त होती. 


3. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. 

 'अ' गट 

'ब' गट 

1) आळस 

2) आदर 

3) आस्था

4) आपुलकी 

अ) अनास्था

ब) दुरावा

क) उत्साह

ड) अनादर

उत्तर :

 'अ' गट 

'ब' गट 

1) आळस 

2) आदर 

3) आस्था

4) आपुलकी 

इ) उत्साह

ई) अनादर 

अ) अनास्था

आ) दुरावा


4. खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून आधेरेखित करा. 

अ. सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. 

उत्तर :

सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.  

 

आ. दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. 

उत्तर :

दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. 


इ. कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. 

उत्तर :

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात


5. कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. 

(खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित, आमची)

अ. समुद्रकिनारी ........................ सहल गेली होती. 

उत्तर :

समुद्रकिनारी आमची सहल गेली होती. 


आ. खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ........................ झाला. 

उत्तर :

खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला. 


इ. विजय अजयपेक्षा ...................... चपळ आहे. 

उत्तर :

विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे. 


ई. रवीला ..................... कैऱ्या खायला खूप आवडतात. 

उत्तर :

रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात. 


उ. मला गाणी ऐकण्याची ................... आवड आहे. 

उत्तर :

मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे. 


ऊ. राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ................. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. 

उत्तर :

राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. 


6. खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. 

उत्तर :



7. स्वमत

अ. 'आमची ढाळज म्हणजे गावाचं  वर्तमानपत्र होतं' या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. 

उत्तर :

वर्तमानपत्रातील माहिती जशी सर्व लोकांपर्यंत पोचते तशाच आजीच्या वाड्यात बायका ज्या ज्या विषयांवर बोलत असत त्याची पुढे गावभर चर्चा होत असे. 


आ. तुलना करा / साम्य लिहा.

आगळ - वाड्याचे कवच

आजी - कुटुंबाचे संरक्षक कवच 

उत्तर :

 आगळ 

आजी  

 i) वाड्याचे संरक्षक कवच

ii) घराबाहेर जाता येत नाही. 

iii) रात्री आधार. भीती वाटत नाही. 

i) कुटुंबाची संरक्षक कवच

ii) शब्दाबाहेर जाता येत नाही. 

iii) कठीण प्रसंगात आधार. तिच्यामुळे कुटुंब निर्भय. 


इ. पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. 

उत्तर :

पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंबपद्धतीबाबत माझे मत असे की त्यातल्या काही गोष्टी मला आवडल्या, चांगल्या वाटल्या, पण काही गोष्टींबद्दल माझे मत प्रतिकूल आहे. 

एकत्र कुटुंबपद्धतीत - i) शिस्त लागते ii) वळण मिळते iii) समतेची वागणूक असते आणि iv) भेदभाव नसतो v) संरक्षण मिळते. ह्या सर्व चंगल्या गोष्टी पाठात चित्रित झाल्या आहेत. 

पण त्याचवेळी आजी i) हुकूमशाही पद्धतीने वागते. 'आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या......' असे वाक्य पाठात आहे. ज्येष्ठांबद्दल प्रेम व आदर असावा, त्याची भीती वाटू नये. 

ii) या पद्धतीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याला बाधा निर्माण होत असे. 

iii) प्रत्येक सुनेला सर्व कामे करता आली पाहिजेत आणि त्यांची कामे रोटेशनप्रमाणे बदलायची. म्हणजे स्वयंपाकात ती सुगरण असेल तिने भांडी घासावीत आणि धडधाकट सुनेने बेचव स्वयंपाक करायचा. अमिताभने क्रिकेट खेळावे व सचिनने अभिनय करावा असेच हे चित्र आहे. या मला ब पटणाऱ्या गोष्टी आहेत.   


ई. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. 

उत्तर :

आगळ हे वाड्याचे संरक्षक कवच असते. आगळ लावली की घराबाहेर हुंदडण्याची सवयच बंद होते आणि रात्री मात्र तिचा आधार वाटतो. कुटुंबाच्या संदर्भात आजीही कुटुंबाची संरक्षक आहे. तिच्या दराऱ्यामुळे मुले बाहेर हुंदडायला जात नाही. आणि कठीण प्रसंगात मात्र तिचा आधार वाटतो. तिच्यामुळे निर्भय वातावरणात जगते. हे साम्य 'आजी : कुटुंबाचं आगळ' या शीर्षकातूनच दिसून येते. म्हणून हे शीर्षक निश्चितच समर्पक आहे.  

Previous Post Next Post