बदलते जीवन भाग - 2 स्वाध्याय
बदलते जीवन भाग - 2 स्वाध्याय इयत्ता नववी
बदलते जीवन भाग - 2 स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) भारताने ............... च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
अ) सुनील गावसकर
ब) कपिल देव
क) सय्यद किरमाणी
ड) संदीप पाटील
उत्तर :
भारताने कपिल देव च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
2) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ................... भाषेचे प्राबल्य चालले आहे.
अ) पंजाबी
ब) फ्रेंच
क) इंग्रजी
ड) हिंदी
उत्तर :
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य चालले आहे.
2. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा.
...................... | |
...................... | |
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले
उत्तर :
कारण - i) १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली.
ii) याच वर्षी सुनील गावसकर यांनी कसोटींमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
iii) १९८५ मध्ये भारताने 'बेन्सन अँड हेजेस' क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. त्यामुळे भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.
2) चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे
उत्तर :
कारण - i) चित्रपटाच्या क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांच्या नंतर रंगीत चित्रपटांचे युग आले. मनोरंजन क्षेत्रातील हिंदी चित्रपटांचे स्थान अतुलनीय आहे.
ii) हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करू लागले. हिंदी चित्रपट जगभर पोहचले. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले.
iii) पूर्वी ३-४ तास चालणारा सिनेमा दीड तासांवर येऊ लागला.
iv) एकच पडदा आणि एकच सिनेमा १०० आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला. त्यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.
4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.
1) भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे
उत्तर :
i) भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजांबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपूरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत.
ii) त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषासुद्धा आहेत.
iii) बोलीभाषे ऐवजी घराघरांत इंग्रजी भाषेचे स्थान रुजत चालले आहे. त्यामुळे स्वतःच्या बोलीभाषेचा विसर पडत चालला आहे. त्या वेळीच जपायला हव्यात अन्यथा. एक चांगला ठेवा नष्ट होईल. त्यासाठी भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्य आहे.
2) वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा
उत्तर :
i) बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर पडला आहे. \
ii) पूर्वी वृत्तपत्रे कृष्णधवल रंगांत छापली जात होती. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रे रंगीत झाली.
iii) पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे.
iv) वृत्तपत्रे आता अधिक सक्रीय होऊ लागली आहेत. अशा प्रकारे वृत्तपत्राचे स्वरूप बदलले आहे.
3) दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत
उत्तर :
दूरदर्शन या माध्यमात पुढील बदल झाले आहेत.
i) सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे रंगीत झाले.
ii) सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठरावीक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरूप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम वार्तापत्रे, राष्ट्रपती-प्रधानमंत्र्याच्या दौऱ्यांचे सविस्तर वार्तांकन, बातम्या अ एक-एक उपक्रम वाढत गेले.
iii) १९९८ मध्ये स्टार (सॅटेलाइट टेलिव्हि एशिया रिजन) हा खासगी उद्योगसमूह भारतात आल्यामुळे भारतातील सुरुवाती काळातील नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून टाकले.