विधेयकाचे किंवा प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जाते

विधेयकाचे किंवा प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जाते

कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा. 

विधेयकाचे किंवा प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जाते.

पहिले वाचन - संबंधित खात्याचा मंत्री विधेयक मांडताना थोडक्यात त्याचे स्वरूप स्पष्ट करतो.

दुसरे वाचन - याचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पक्ष विधेयकाच्या बाजूने तर विरोधक विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट करतात. दुसऱ्या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर सभागृहात मतदान घेतले जाते.

तिसरे वाचन - या वेळेस विधेयकावर चर्चा होते व विधेयक मंजूर करण्याच्या आवावर मतदान होते. विधेयकाला आवश्यक ते बहुमत मिळाले की विधेयक मजूर होते. 

राज्यसभेतही वरील प्रक्रियेतून विधेयक जाते व नंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. (दोन्ही सभागृहांत मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात मतदान घेतले जाते). 


Previous Post Next Post