इतिहासाची साधने स्वाध्याय
इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता आठवी
प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) इतिहासाच्या साधनांमधील ................ साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
अ) लिखित
ब) मौखिक
क) भौतिक
ड) दृक-श्राव्य
उत्तर :
इतिहासाच्या साधनांमधील दृक-श्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
2) पुण्यातील ................. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
अ) आगाखान पॅलेस
ब) साबरमती आश्रम
क) सेल्युलर जेल
ड) लक्ष्मी विलास पॅलेस
उत्तर :
पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
3) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ................ होय.
अ) पोवाडा
ब) छायचित्र
क) मुलाखती
ड) चित्रपट
उत्तर :
विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय.
प्रश्न. 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.
उत्तर :
ब्रिटिश काळात समाजावर अनेक घातक रूढी, परंपरा व अंधश्रद्धेचा पगडा होता. जात व धर्मावर आधारित गटांतटामध्ये समाजाचे विभाजन झाले होते. घातक रूढी, परंपरांना तिलांजली देऊन आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचे कार्यही काही वृत्तपत्रे करत होती. विष्णुशास्त्री चिपळूकर यांनी निबंधमाला या मासिकातून व लोकहितवादीनी 'प्रभाकर' या साप्ताहिकातून या रूढी-परंपरांवर, जातीवादावर हल्ला चढविला.
2) चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अत्यंत विश्वसनीय साधने मानली जातात.
उत्तरे :
चित्रफिती हे आधुनिक इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण दृक् -श्राव्य साधन आहे. लिखित साधने ही व्यक्तिनिष्ठ असू शकतात. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. चित्रफितीबाबत मात्र व्यक्तिनिष्ठता असत नाही. चित्रफितीमुळे घडलेली घटना जशीच्या तशी पाहता येते, त्यात बदल करणे शक्य नसते. म्हणून चित्रफिती इतिहासाच्या अभ्यासात विश्वसनीय साधने मानली जातात.
प्रश्न. 3. टीपा लिहा.
1) छायाचित्रे
उत्तर :
छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक् स्वरूपाची साधने आहेत. या छायाचित्रांमधून व्यक्ती तसेच प्रसंगाची वास्तविक माहिती मिळते. व्यक्तींच्या छायाचित्रांवरून त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. प्रसंगाची छायाचित्रे तर संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा करतात. वस्तू किंवा वास्तूच्या छायाचित्रांमधून त्या वास्तूचे त्याकाळचे वैभवाचे दर्शन होते. मध्ययुगीन काळात रेखाटलेल्या चित्रांपेक्षा छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात.
2) वस्तुसंग्रहालये आणि इतिहास
उत्तर :
गत इतिहासाची साक्ष पटविणाऱ्या विविध वस्तू, बाहुल्या, कपडे, दागिने, भांडी उत्खननामध्ये सापडतात. अशा वस्तूंचा संग्रह वस्तुसंग्रहालयामध्ये केलेला असतो. तसेच वस्तुसंग्रहालयामध्ये इतिहासातील दुर्मिळ चित्रे व छायाचित्रे जतन केलेली असतात. त्यावरून आपणास त्या काळच्या समाजजीवनाची माहिती मिळते.
पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. अंदमान येथील सेल्युलर जेलमधील संग्रहालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या कालावधीतील वास्तव्याची माहिती मिळते.
3) श्राव्य साधने
उत्तर :
ज्या साधनांचे श्रवण करून आपणास त्या काळातील इतिहासाची माहिती मिळते, त्यांना इतिहासाची श्राव्य साधने म्हणतात. ध्वनिमुद्रिते ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी केलेली भाषणे, गीते, घोषणा या ध्वनिमुद्रित स्वरूपात जतन केल्या आहेत
रवींद्रनाथ टागोरांनी स्वत: गायलेले राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस यांची 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा।' ही घोषणा ही ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचा वापर श्राव्य साधने म्हणून करता येतो.
प्रश्न. 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
उत्तर :