संकल्पना स्पष्ट करा शेतीचे व्यापारीकरण
उत्तर :
इंग्रजी सत्तेच्या पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. मात्र इंग्रज सरकारने कापूस, नीळ व तंबाखू यांसारख्या नगदी पिकांना उत्तेजन दिले. त्यामुळे लोकांनी अन्नधान्यांऐवजी जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर भर दिला. या प्रक्रियेला 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात.