संकल्पना स्पष्ट करा मुलकी नोकरशाही
उत्तर :
भारतात स्थापन केलेली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये, असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्यांचे पगार वाढवले.
प्रशासनाच्या सोईसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्याची भरती 'इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस' (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.