आम्ल व आम्लारी फरक स्पष्ट करा

आम्ल व आम्लारी फरक स्पष्ट करा

आम्ल व आम्लारी फरक स्पष्ट करा

आम्ल व आम्लारी फरक लिहा

उत्तर :

 आम्ल 

आम्लारी  

 

i) एखादा पदार्थ पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H हे एकमेव कॅटायन तयार होतात, त्यांना आम्ल म्हणतात. 

ii) निळा लिटमस कागद आम्लामध्ये टाकल्यास लाल होतो. 

iii) आम्ल पदार्थाची चव आंबट असते. 

iv) आम्लधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेकशा कमी असतो. 

v) आम्ल हे अधातूंच्या ऑक्साइडपासून तयार होतात. 

vi) उदाहरण : HCl, HNO3, HBr, H2SO4

 

i) एखादा पदार्थ पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH हे एकमेव अँनायन तयार होतात, त्यांना आम्लारी म्हणतात. 

ii) लाल लिटमस कागद आम्लारीमध्ये टाकल्यास निळा होतो. 

iii) आम्लारी पदार्थाची चव तुरट असते. 

iv) आम्लारीधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा जास्त असतो. 

v) आम्लारी हे धातूंच्या ऑक्साइडपासून तयार होते. 

vi) उदाहरण : NaOH, KOH.

Previous Post Next Post