इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले.
उत्तर :
इंग्रजांनी भारताला केवळ 'बाजारपेठ' या दृष्टिकोनातून पाहिले. भारतातील कच्चा माल कमी किमतीत घेऊन त्यापासून तयार केलेला पक्का माल भारतीयांनाच जास्त किमतीत विकायचा, असे इंग्रजांचे धोरण होते. भारतीय उद्योगातून तयार होणारा माल कमी किमतीत मिळू नये या हेतूने इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्यावर जाचक कर बसविले.