सकारण स्पष्ट करा
ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.
उत्तर :
ब्रिटिश काळात समाजावर अनेक घातक रूढी, परंपरा व अंधश्रद्धेचा पगडा होता. जात व धर्मावर आधारित गटांतटामध्ये समाजाचे विभाजन झाले होते. घातक रूढी, परंपरांना तिलांजली देऊन आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचे कार्यही काही वृत्तपत्रे करत होती. विष्णुशास्त्री चिपळूकर यांनी निबंधमाला या मासिकातून व लोकहितवादीनी 'प्रभाकर' या साप्ताहिकातून या रूढी-परंपरांवर, जातीवादावर हल्ला चढविला.