शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ?
उत्तर :
१९४५ पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक गोष्टी / बाबी कारणीभू ठरल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
i) सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचेअर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले.
ii) सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 'पेरेस्त्रोईका' (पुनर्रचना) आणि 'ग्लासनोस्त' (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
iii) पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
iv) सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वांत मोठा देश होता.