बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय
इयत्ता नववी भूगोल बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय
प्रश्न. 1. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) कायिक विदारण म्हणजे काय ?
उत्तर :
i) वातावरणाशी संबंध येऊन खडकांचे विच्छेदन होण्याच्या प्रक्रियेस कायिक विदारण असे म्हणतात.
ii) खडकांचे फुटणे, तुटणे, बारीक तुकडे होणे यालाच कायिक विदारण म्हणतात.
iii) यात मुख्यतः औष्णिक ताण, स्फटिकीकरण, दाबमुक्ती इत्यादी प्रक्रियांचा समावेश होतो.
iv) कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.
2) रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?
उत्तर :
रासायनिक विदारणाचे पुढील तीन प्रकार आहेत.
i) कार्बनन - पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. कर्बाम्लात चुनखडकातील कॅल्शियम कार्बोनेटसारखे क्षार सहजगत्या विरघळून खडकांचे विघटन होते.
ii) द्रवीकरण - मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारापासून रासायनिक अवशेषण होऊन चुनखडी तयार होते. द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.
iii) भस्मीकरण - ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.
3) जैविक विदारण कसे घडून येते ?
उत्तर :
i) पृथ्वीवरील जैविक घटकांच्या क्रियेमुळे जे खडकांचे विखंडन होते त्यास 'जैविक विदारण' असे म्हणतात.
ii) वनस्पती आणि प्राणी हे पृथ्वीवरील प्रमुख जैविक घटक आहेत. वनस्पती, जीव-जंतू, प्राणी व मानव यांच्यामुळे जैविक अपक्षय क्रिया घडून येते.
iii) जैविक विदारण कायिक किंवा रासायनिक प्रकारचे असू शकते.
vi) पाण्याच्या शोधार्थ वनस्पतींची मुळे खडकांच्या भेगांतून खोलीपर्यंत शिरतात. वनस्पतींच्या वाढींबरोबर त्या मुळांचीही वाढ होते. ही मुळे मोठी झाल्याने खडकांच्या भेगांवर दाब पडून भेगा रुंदावतात. या क्रियेमुळे खडक फुटतात व विदारण घडून येते.
v) काही प्राणी-जीवजंतू जमीन पोखरून बिळे तयार करतात. या क्रियेतही विदारण होते.
vi) वनस्पतींच्या मुळाशी असणारे पाणी काही अंशी आम्लधर्मी असल्याने अशा पाण्याजवळील खडक रासायनिक विदारणास बळी पडतात.
4) विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा
उत्तर :
विदारण | विस्तृत झीज |
i) खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला 'विदारण' असे म्हणतात. ii) विदारणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत. कायिक, रासायनिक व जैविक. |
प्रश्न. 2. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
1) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
2) आर्द हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
3) शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
4) खटकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
5) अपपर्णनातून जांभा खडकांची निर्मिती होते.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
कारण - i) अपपर्णन ही क्रिया जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात होत असते. उदा. उष्ण वाळवंटी प्रदेशात जास्त तापमान असल्याने तिथे ही क्रिया घडते. त्यामुळे तिथे रेताड मृदा आहे.
ii) जांभी मृदा ही उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात आढळते.
प्रश्न. 3. खालील ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न. 4. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
1) काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात.
उत्तर :
जैविक विदारण
2) खडकातील लोहावर गंज चढतो.
उत्तर :
रासायनिक विदारण
3) खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो.
उत्तर :
कायिक विदारण
4) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.
उत्तर :
कायिक विदारण
5) ओसाड प्रदेशात वाळू तयार होते.
उत्तर :
कायिक विदारण
प्रश्न. 5. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.
उत्तर :
हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे. जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो, पण पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुत करून पावसाशी जोडल्या जाऊ शकतात. पश्चिम घाटात दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन घडत असते.
i) १८ जून २०१७ रोजी मेघालय येथील थारिया गावात भूस्खलन झाले. सतत एक आठवडा पाऊस व अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. यात ६ नागरिक मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. अनेकांची घरे मातीखाली गेली असून अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत.
ii) ३० जुलै २०१५ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात माळीण हे गाव वसलेले आहे. अतिवृष्टीमुळे पहाटे डोंगरकडा कोसळल्याने माळीण गावचे रहिवासी गाढ झोपेत असतानाच गावाचा सुमारे ७० टक्के भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्यामध्ये स्त्री-पुरुष, लहान बालके असे सुमारे ४०० जण गाडले गेले, येत तसेच जनावरे, पाळीव प्राणीही गाडल्या गेले.